Vasai-Virar  sakal
मुंबई

Vasai: शॉक लागल्याने अकरा वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू

Death: बिलाल हा संध्याकाळच्या सुमारास खेळण्यासाठी बाहेर निघाला होता, वसईतील एका महिन्यात ही दुसरी घटना आहे.

सकाळ वृत्तसेवा

Death Due To Electric Shock: वसईत विजेचा शॉक लागून एका अकरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी 27 जून रात्रीचा सुमारास घडली आहे.

बिलाल सिराज शेख असे मृत झालेल्या मुलाचे नाव असून तो वसई पश्चिम वसई गाव, भास्कर आली, डिसोझा हॉस्पीटल जवळील परिसरात राहणारा होता. बिलाल हा संध्याकाळच्या सुमारास खेळण्यासाठी बाहेर निघाला होता.

रात्री सायकलने जात असताना तोल जाऊन बिलाल उघड्या मितर बॉक्स वर जाऊन पडला यामुळे त्याला शॉक लागला व जागीच त्याचा मृत्यू झाला. वसईतील एका महिन्यात ही दुसरी घटना आहे.

उघड्या मीटर बॉक्स मुळे आता पर्यंत अनेक लहान मुलांचे जीव गेले आहेत. या पूर्वी एव्हरशाईन मध्ये देखील अशीच घटना घडली होती.

प्रत्येक पावसाळ्यात महावितरणचे मिनी पिलर खराब अवस्थेत रस्त्यालगत दिसून येते व पाणी साचल्यानंतर विजेचा शॉक लागून कित्येक लोकांचा दुर्देवी मृत्यू होण्याचा घटना होतात. महावितरणचे डीपी बॉक्स, विद्युत यंत्रणा नदुरस्त असल्याने तसेच पावसाळ्या पूर्वी ही कामे न झाल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : संविधानावर बोलताना राहुल गांधींचा माईक झाला बंद, सुरु होताच म्हणाले, कितीही प्रयत्न करा, पण...

Potato : सर्वांच्या लाडक्या बटाट्याचा जन्म भारतातला नाहीच ! बटाट्याच्या भाजीच्या अनेक पद्धती काय ? जाणून घ्या आरोग्याचे फायदे

Pan Card Update : महत्त्वाची बातमी! बंद होणार जुने पॅनकार्ड, जाणून घ्या नव्या पॅन कार्डसाठी किती खर्च येईल

Farmers Income: शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची नवी योजना; शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 20,000 रुपये

IPL Auction: १३ वर्षीय Vaibhav Suryavanshi साठी राजस्थानने का मोजले १ कोटी! द्रविडने सांगितलं कारण; वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT