vashi onion potato market theft case police action mumbai agriculture market esakal
मुंबई

Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये कांदा-बटाटा बाजारात चोरांचा सुळसुळाट ; वाचा नक्की काय आहे प्रकरण

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या बाजारात चोरांचा सुळसुळाट झाल्याने व्यापारी आणि खरेदीदार ग्राहक हैराण

सकाळ वृत्तसेवा

वाशी : वाशीतील कांदा-बटाटा बाजारात मोठ्याप्रमाणात राज्यातून आणि परराज्यातून कांदा-बटाटा मालाची आवक होत असते. हा बाजार नेहमी गजबजलेलाच असतो. परंतु या गजबजाटाचा फायदा चोरांनी घेतल्याचे दिसून येत आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या बाजारात चोरांचा सुळसुळाट झाल्याने व्यापारी आणि खरेदीदार ग्राहक हैराण झाले आहेत. या चोऱ्यांसंदर्भात कांदा-बटाटा आडत व्यापारी संघातर्फे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला लेखी तक्रार देखील करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने आज (१८ जानेवारी) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व आडत व्यापारी संघाची बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली आहे.

कांदा-बटाटा आडत व्यापारी संघाने केलेल्या तक्रारीनुसार बाजारात लहानमुले, स्त्रिया, भिकारी यांसारखे लोक कांदा, बटाटा, लसूण यासारखा शेतमाल विक्री होत असताना खाली पडलेला शेतमाल कोणाच्याही नकळत गोळा करून नेत असतात.

त्याच बरोबर बाजारात मोबाईल, रोख रक्कम चोरीला जाण्याचे प्रकारही वाढले आहेत.गेल्या दोन-तीन दिवसांत एका व्यापाऱ्याचा मोबाईल चोरीला गेला असून एका खरेदीदाराची पैशांनी भरलेली बॅग देखील चोरीला गेलेली असल्याची माहिती मिळाली आहे.

"बाजारात गजबजाट असल्याने आम्हाला प्रत्येकवेळी सगळीकडे लक्ष देणे शक्य नसते. त्यामुळे चोर त्याचा फायदा घेत चोऱ्या करत आहेत. आमची मुंबई कृषिउत्पन्न बाजार समितीकडे अशी मागणी आहे की त्यांनी बाजार आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि अनोखळी,

संशयास्पद व्यक्तींची सुरक्षा रक्षकांकडून तपासणी करून घ्यावी. त्याच सोबत एपीएमसी पोलीस ठाण्यातील पोलिसांची गस्त सुद्धा वाढवावी. जेणेकरून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर आणि चोरांवर पोलीस प्रशासनाचा धाक निर्माण होईल."

-संजय पिंगळे, कांदा बटाटा व्यापारी व कांदा बटाटा आडत व्यापारी संघ अध्यक्ष.

"दि. ८ जानेवारी रोजी कांदा-बटाटा माल खरेदीसाठी बाजारात आलो असता. सकाळी १० च्या सुमारास माझी पैशांनी भरलेली बॅग अचानक चोरीला गेली. त्यात ७० हजार इतकी रोख रक्कम होती. या संदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतु अद्याप पैशांनी भरलेल्या बॅगेचा पत्ता लागलेला नाही. या अचानक झालेल्या चोरीमुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे."

- इम्तियाज अहमद शेख, खरेदीदार/सप्लायर

या संदर्भात एपीएमसी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अपुऱ्या पोलीस बळामुळे गुन्हेगार शोधण्यास वेळ लागत असला तरीही लवकरात लवकर याची चौकशी पूर्ण करून चोरांचा तपास लावण्यात येईल अशी माहिती मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: आज शेअर बाजार राहणार बंद; बीएसई आणि एनएसईवर कोणतेही ट्रेडिंग होणार नाही

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Sweet Potato Patties: सकाळी नाश्त्यात बनवा चटपटीत रताळं पॅटिस, जाणून घ्या रेसिपी

Congress : समाजात फूट पाडण्यासाठीच भाजपने कलम 370 चा मुद्दा जिवंत ठेवलाय, खर्गेंचा हल्लाबोल

Satara Assembly Election : संदेश, रिल्स पाहताना सावधानता बाळगा...एपीके फाइलवर क्लिक नको, अन्यथा बँक खाते होईल रिकामे

SCROLL FOR NEXT