मुंबई

Mumbai News : ४ वर्षांनी मुंबईत पुन्हा एकदा होणार "वस्त्र" महोत्सव

विभाग पुन्हा घेऊन येतोय त्यांचा तांत्रिक आणि फॅशन कार्यक्रम "वस्त्र" पुन्हा एकदा त्याच जोमात आणि जल्लोषात | The department is bringing back its technical and fashion program "Vastra" once again with the same vigor and excitement

सकाळ वृत्तसेवा

मुंबईमध्ये कापड गिरण्यांचा खूप मोठा इतिहास आहे. असाच इतिहास माटुंगा मधे असलेल्या व्ही.जे.टी.आ.यचा सर्वात पहिला विभाग म्हणजेच टेक्सटाइलट विभागचा आहे. हा विभाग पुन्हा घेऊन येतोय त्यांचा तांत्रिक आणि फॅशन कार्यक्रम "वस्त्र" पुन्हा एकदा त्याच जोमात आणि जल्लोषात.

२००३ मध्ये पहिल्यांदा सुरू झालेला हा कार्यक्रम गेल्या ४ वर्ष कोविडमुळे साजरा केला गेला नाही. पण यंदा ह्या विभागातल्या मुलांनी आपुलकीने आणि परंपरेचा मान ठेवण्यासाठी हा कार्यक्रम पुन्हा एकदा ४ वर्षाने साजरा करायचे ठरवले आहे.

"वस्त्र" खूप वेगळा सोहळा असून टेक्स्टाईल क्षेत्राच्या वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थ्यांना एकत्र येण्याची संधी नेहमी प्रमाणे देत आहे. या कार्यक्रमाची संकल्पनाच पूर्ण वेगळी असल्याने काम करायला खूप अभिमान आणि उत्साह वाटतो, महाविद्यालयाचे शिक्षक आणि “वस्त्र” चे सदस्य यांच्या एकत्रित प्रयत्नांन मुळे हा कार्यक्रम पार पाडला जातो.

"सस्टेनेबलिटी" अशी यंदाची थीम घेऊन आलेल्या वस्त्र मध्ये या क्षेत्रातील कॉर्पोरेट जगात वावरणारे मान्यवर आणि भविष्यात त्याचा भाग बनणारे विद्यार्थी यांच्या विचारांची देवाणघेवाण होते. यासाठी तंत्रज्ञानावर आधारित टेक्निकल क्विझ, पोस्टर प्रेझेंटेशन, ड्रेपिंग फ्युजन, स्पॉनटेनियस स्केचिंग या स्पर्धेचे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आले आहे. विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे.

“वस्त्र" मध्ये आतुरतेने वाट पाहत असलेली स्पर्धा म्हणजे "फॅशन शो", जे ह्या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू आहे कारण सहभागी टेक्सटाईल उद्योगातील तंत्रज्ञान, डिझाइन आणि टिकाऊपणाचे छेदनबिंदू शोधतात. याव्यतिरिक्त, प्रतिभावना व्यक्तींनी तयार केलेल्या आहेत.

नवीन ट्रेंड आणि "अल्युमिनाय भेट" करण्याचे आश्वासन देऊन हा कार्यक्रम नेत्रदीपक बक्षीस देऊन हा समारंभ समाप्त करण्यात येईल.

या ऐतिहासिक कार्यक्रमाचा भाग होण्यास उत्सुक असलेल्यांसाठी, सहभाग तपशील आणि नोंदणी माहिती अधिकृत "वस्त्र" च्या वेबसाइटवर [www.vastravjti.org] वर जाऊन बघु शकता. "वस्त्र" पुन्हा एकदा व्ही.जे.टी.आय च्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्थळावर आपली ठसा उमटवण्याच्या तयारीत आहे, सहभागी आणि उपस्थितांना विनंती आहे आमच्या वेबसाईट वर जाऊन नोंदणी करावे.

चला तर मग भेटूया २१ आणि २२ मार्च ला व्ही.जे.टी.आय महाविद्यालया मध्ये "वस्त्र" परिवारा सोबत!..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT