Veer Jijamata Bhosle Park and Zoo 19 crore for Penguins four years mumbai sakal
मुंबई

मुंबई : पेंग्विनसाठी चार वर्षांत १९.११ कोटींचा खर्च

ही पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी गत चार वर्षांमध्ये तब्बल १९.११ कोटींचा; तर प्राणिसंग्रहालयातील उद्यानासाठी ९.५२ कोटींचा खर्च केल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली. दरम्यान, ही पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी उद्यान विभागाने गेल्या चार वर्षांत केलेल्या खर्चाची माहिती मागितली होती. त्याबाबत महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने २०१८ ते २०२१ पर्यंत म्हणजे गेल्या ४ वर्षांत तब्बल २४३.६५ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यात भायखळा प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्यात एन्ट्री प्लाझा, अंतर्गत पॉकेट गार्डन, सार्वजनिक सुविधा, सीसी टीव्ही, इंटरप्रिटेशन सेंटर, पेंग्विन प्रदर्शन, तृणभक्षकांसाठी क्वारंटाईन, प्राणिसंग्रहालय, किचन कॉम्प्लेक्स, हेरिटेज स्ट्रक्चरचे जीर्णोद्धारासाठी तब्बल ९५ कोटी; तर दुसऱ्या टप्प्यांत इतर कामांसाठी ६२.९१ कोटी रुपये खर्च केले. त्यात लांडगा, अस्वल, मांजरांचे कॉम्प्लेक्स; कोल्हा, तरस, बिबट्या, पक्ष्यांचे जाळे, मगर, कासवांचे तलाव यांचा समावेश आहे. शिवाय दुसऱ्या टप्प्यातील निविदेत वाघ, सिंह, सांबर, हरण, नीलगाय, चार शिंगी मृग, हरण, काळवीट आणि पक्ष्यांचे आणखी एक जाळे आदींसाठी ५७.११ कोटी खर्च करण्यात आल्याचे म्हटले आहे.

दमट हवामान मारक

पेंग्विन हा पक्षी अंटार्टिका खंडातील बर्फाच्छादित प्रदेशात राहणारा पक्षी आहे. तो इतर कोणत्याही प्रकारच्या वातावरणात जगू शकत नाही. तसेच मुंबईतील दमट वातावरणात पेंग्विन फार काळ जगणार नाहीत, असा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला होता.यानंतर २०१७ मध्ये राजकीय वाददेखील उफाळून आला होता. वातावरण चांगलेच तापले आहे. त्याचे पडसाद आता ही अधूनमधून उमटत असतात. पेंग्विनला मुंबईत आणायचे निश्चित झाल्यानंतर पालिकेने राणीबागेत अंटार्टिका खंडाच्या वातावरणाच्या धर्तीवर अत्युच्च दर्जाची सुविधा निर्माण केली. त्यानंतर एक अपवाद वगळता पेंग्विन जोमाने वाढले. त्यांनतर दोन पिल्ले ही जन्माला आली. त्यांनतर वाद काहीसा शमला.

वन्यजीव तज्ज्ञांचा होता विरोध

पेंग्विन पक्षाला मुंबईत आणण्यास अनेक वन्यजीव तज्ज्ञांनी विरोध केला होता. पेंग्विन हा नैसर्गिक उणे वातावरणात कळपाने राहणारा पक्षी असल्याने तो कृत्रिम वातावरणात जगणार नाही, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे होते. मुंबईतही वातावरण दमट तसेच प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याने त्याचाही परिणाम पेंग्विनवर होईल, अशी भीती व्यक्त होत होती. प्रसिद्ध वन्यजीव तज्ज्ञ देबी गोएंका यांनीदेखील त्या वेळी नाराजी व्यक्त केली होती. ‘असे करणे योग्य नाही. मी प्राणी पिंजऱ्यात ठेवण्याच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. इतर देशांतून पेंग्विन इथे आणणे हा एक अनावश्यक प्रयत्न आहे. ’ असे त्यांनी म्हटले होते.

नागरिकांपेक्षा प्राणी सुखात!

उद्यान विभागाचा खर्च लक्षात घेता प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन, वाघ तसेच अन्य प्राणी मुंबईकरांपेक्षा चांगले जीवन जगत आहेत. प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या या घरांची किंमत प्रत्येकी पाच ते नऊ कोटी इतकी आहे. सर्वसामान्य मुंबईकरांनी भरलेल्या करातून हा खर्च केला आहे. याउलट अनेक जणांना दहा बाय दहाचे घर घेण्याचे स्वप्नदेखील पूर्ण करता येत नाही, असे ‘द यंग व्हिसलब्लोअर्स फाऊंडेशन’चे संयोजक जितेंद्र घाडगे म्हणाले.

पर्यटकांच्या संख्येत वाढ

1 पेंग्विन राणी बागेत दाखल झाल्यापासून पर्यटकांची संख्या २० ते २५ टक्के वाढली. शनिवार-रविवार तर बागेत पाय ठेवायला ही जागा नसते.

2 एका दिवसात २५ ते ३० हजार पर्यटक हजेरी लावतात. अनेकांना पेंग्विन पक्षी प्रत्यक्ष पाहणे शक्य नसल्याने राणी बाग प्रकल्पामुळे त्यांना प्रत्यक्ष दोन-तीन फुटांवरून पेंग्विन पाहता येतो.

3 यामुळे वर्षाला पालिकेच्या महसुलात ही वाढ झाली आहे. वर्षाला २५ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल सध्या जमा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT