Vegetables tomato price hike Substitutes for tomato food hotel business Sakal
मुंबई

Tomato : टोमॅटोसाठी गृहिणींचा देशी जुगाड; हे आहेत टोमॅटोला पर्यायी पदार्थ

टोमॅटो भारतीय फळभाजी नाहीच

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आज देशभरात टोमॅटोचे भाव गगगनाला भिडले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, घरगुती खानावळी चालविणारे व्यावसायिक आणि गृहिणी यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. तर अनेकांनी आता टोमॅटोला पर्यायी पदार्थही वापरण्यास सुरुवात केली आहे.

मुळात, टोमॅटो हे काही भारतीय फळभाजी नाही त्यामुळे आजही अनेक भागात टोमॅटोला आमसूल, चिंच, कैरी यासारखे पर्याय रोजच्या जेवणात वापरले जात आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा टोमॅटोला पर्याय असणाऱ्या भारतीय पदार्थ स्वयंपाकात आणि जेवणात वापरावे असे शेफ नितीन शेंडे सांगतात.

आज जेवणाला आंबट चव येण्यासाठी आणि एखाद्या पातळ रसा असणारी भाजी घट्ट व्हावी यासाठी स्वयंपाकात टोमॅटोचा वापर केला जातो. तसेच, सॅलड म्हणूनही जेवणात टोमॅटो वापरला जातो. मात्र, टोमॅटो ही भारतीय फळभाजी नाही.

१६ व्या शतकात इंग्रजांनी टोमॅटोची भारतीयांना ओळख करून दिली. टोमॅटोचा वापर पेरू या देशात सर्वप्रथम खाद्यपदार्थांमध्ये केला जात होता. मात्र १६ व्या शतकापूर्वी भारतात टोमॅटो नसतानाही खाद्यपदार्थ बनविले जात होतेच.

त्यावेळी आपल्या परिसरात, भागात सर्वात स्वस्त उपलब्ध असणारी वस्तू स्वयंपाकात वापरली जात असे. जसे की, कोकणात खोबर सहज आणि मोठ्याप्रमाणात वापरले जाते. आजही तिथे भाज्या घट्ट होण्यासाठी खोबऱ्याचे प्रमाण अधिक आहे.

पूर्वी खाद्यपदार्थांना आंबट चव यावी यासाठी चिंच, आमसूल (कोकम), कैरी, सुकलेली कैरी यांसारखे पदार्थ वापरले जात होते. आजही दक्षिणात्य खाद्यपदार्थांमध्ये आजही चिंच दिसते. त्यामुळे आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीत टोमॅटोला अनेक पर्याय बाजारात अगदी स्वस्तात उपलब्ध आहे.

भारत असा देश आहे ज्याच्याकडे २ लाखांहून अधिक खाद्यसाहित्य (ingredients) उपलब्ध आहेत. जी एकाही देशाकडे नाही. ज्याची नावंही आपल्याला माहित नाही.

आपल्या लोकांना अजून माहीतच नाही की टोमॅटो, मिरची हे भारतीय नाही. टोमॅटोबाबत खूप संशोधन झाले. आज टोमॅटो बघितला तर तो गोड असतो.रासायनिक प्रक्रिया केलेले टोमॅटो आज बाजारात आहेत जे आकार आणि रंगानीही वेगळे आहेत. भारतीयांनी आता अधिकाधिक भारतीय पदार्थ आणले पाहिजे.

- नितीन शेंडे, शेफ

आम्ही पहिल्यापासूनच भाज्यांमध्ये टोमॅटोचा वापर कमीच करतो. गावी खोबऱ्याचा सार, रस्सा आवडीचा असल्याने आम्ही अनेक भाज्या खोबरं टाकून बनवतो. मात्र पुलावमध्ये, सॅलड म्हणून आमच्या घरात टोमॅटो आम्ही आणतो. आता महाग आहे तर थोडे दिवस अगदी एक किलो ऐवजी आम्ही आता पावशेर किंवा दोन टोमॅटो येईल एवढे घेतो.

-साक्षी सावंत, गृहिणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT