मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वस्तू खरेदीला प्राधान्य देणाऱ्यांनी यावर्षी सुद्धा सुसाट खरेदी केली आहे. कोरोनाचा काळ असल्याने वाहन खरेदीवर परिणाम होणार असल्याची भिती असताना, गेल्या वर्षीच्या तुलनेत दसऱ्यापुर्वीच्या आठ दिवसांच्या वाहन खरेदीची आकडेवारी बघता, 2019 मध्ये 1 ते 8 ऑक्टोबरपर्यंत 46,779 वाहने खरेदी केले होते तर यावर्षी 18 ते 25 ऑक्टोबरपर्यंत 56,920 वाहनांची खरेदी केली आहे.
यावर्षी मार्च महिन्यापासूनच राज्यात कोरोनाचे संक्रमण सुरू झाले. त्यामूळे राज्यासह देशभरात लाॅकडाऊन करण्यात आले होते. दरम्यान जुन महिन्यापासून राज्यात अनलाॅक सुरु झाले. मात्र, दरम्यानच्या काळात राज्याची आर्थिक स्थिती ढासळली, शिवाय राज्यातील प्रत्येक व्यवसायावर सुद्धा परिणाम झाला. त्यामूळेच दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन खरेदीवरसुद्धा परिणाम होईल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी वाहनांची सुसाट खरेदी झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊन असल्याने, रेल्वे, एसटी बस सेवा, खासगी प्रवासी वाहतूक बंद होती. त्यानंतर आता, एसटी, खासगी प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. तर लांब पल्यावरील रेल्वेच्या सुद्धा ठरविकच गाड्या धावत असून, मुंबई उपनगरातील लोकल सेवा सरसकट रेल्वे प्रवाशांसाठी बंद आहे. त्यातही कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सार्वजनिक प्रवासी वाहतूक टाळून खासगी वाहनांच्या प्रवासावर जास्त भर देतांना दिसून येत आहे.
भविष्यात रस्त्यावर वाहतूक कोंडी
कोरोना काळात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खासगी वाहनांची खरेदी करत आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकीचा समावेश आहे. त्यामूळे भविष्यात रस्त्यावरील वाहने वाढण्याची भिती असून, त्यामूळे मुंबईसह राज्यातील रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाची बातमी : मुंबईत हाय अलर्ट, ड्रोन उडवण्यास पोलिसांची बंदी
दोन वर्षातील दसऱ्याच्या मुहूर्तावरील फरक
8 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2020 मध्ये 56,920 नविन वाहनांची नोंदणी झाली. तर यातून 255 कोटी 71 लाख 94 हजार 069 महसुल प्राप्त झाला. तर गेल्या वर्षी 1 आक्टोबर ते 8 ऑक्टोबर 2019 मध्ये 46779 नविन वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. तर 207 कोटी 11 लाख 23 हजार 099 महसुल प्राप्त झाला होता.
आरटीओ - वर्ष 2019 - वर्ष 2020
vehicles sales figures amid dussehra and corona unlock in maharashtra
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.