मुंबईच्या वर्सोवा बीचवर झोपेत असताना एका वेगवान एसयूव्हीने दोघांना चिरडले. यामध्ये एका 36 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नागपूरच्या असलेल्या कोरिओग्राफर आणि इव्हेंट ऑर्गनायझरला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक म्हणून काम करणारे गणेश यादव आणि बबलू श्रीवास्तव असे दोघेजण वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर झोपले होते तेव्हा हा अपघात घडला. ही घटना 12 ऑगस्टच्या पहाटेचे आहे.
बबलू श्रीवास्तव यांच्या डोक्यावर आणि हातावर जोरदार दणका बसल्यानंतर त्यांना जाग आली. तेव्हा त्यांनी पाहिले की, शेजारी झोपलेल्या गणेश यांना चिरडत त्यांच्या अंगावरून कार गेली, असे पोलिसांनी सांगितले.
या घटनेत श्रीवास्तव यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून ते बेशुद्ध पडले होते.
अपघात घडल्यानंतर कारमधील दोघेजण खाली उतरले. परंतु, यादव गंभीर जखमी झाल्याचे आणि प्रतिसाद देत नसल्याचे पाहून आणि घटनास्थळी लोक जमा होऊ लागल्याने त्यांनी त्यांच्या कारमधून घटनास्थळावरून पळ काढला, असे पोलीस म्हणाले.
कोरिओग्राफर असलेला निखिल जावडे, हा अपघात घडला त्यावेळी कारच चालवत होता. यावेळी त्याच्यासोबत कारमध्ये त्याचा मित्र शुभम डोंगरे हा देखिल होता. दरम्यान पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.
गणेश यादव हा वर्सोवा येथील सागर कुटीर येथे राहत होता. रविवारी रात्री गणेश आणि त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव वर्सोवा बीचवर झोपायला गेले कारण त्यांच्या घरात खूप उष्णता होती.
सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास एमएच-32-एफई-3033 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीने समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या गणेशला चिरडले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार गणेश जखमी झाला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढत आहेत. अशात मुंबईच्या वर्वोवा समुद्रकिनारी हा अपघात घडला. यामध्येही अपघातानंतर आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. पण अपघातानंतर तेथिल एका स्थानिकाने मोबाईलवर कारच्या नंबर प्लेटचा फोटो काढला होता. त्यामुळे वर्सोवा पोलिसांना घटनेच्या तीन तासांच्या आत आरोपींना शोधण्यात यश आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.