मुंबई- हरित वसईच्या संरक्षणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे, ज्येष्ठ मराठी साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, 'सुवार्ता'कार फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन झाले आहे. त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दीर्घ आजाराने निधन झालंय. गेल्या काही वर्षांपासून ते आजाराशी लढत होते. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली.
वसईतील राहत्या घरी असताना त्यांनी जगाचा निरोप घेतला. उस्मानाबाद ( धाराशीव) येथे पार पडलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भूषवलं आहे. त्यांच्या जाण्यामुळे मराठी साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जेलाडी येथील त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. होली स्पिरिट चर्च (नंदाखाल) येथे त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल. त्यांचे अत्यंसंस्कार सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात येईल.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी १९७२ मध्ये कॅथलिक धर्मगुरुपदाची शपथ घेतली होती. ते धर्मगुरू असले तरी त्यांची ओळख पर्यावरणप्रेमी, जुलूमाविरोधात आवाज उठवणारे अशी होती. पालघर जिल्ह्यात त्यानी पर्यावरण बचावासाठी वारंवार आवाज उठवला होता. त्यांनी सुवार्ता नावाचे एक मासिक सुरू केले होते. या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे काम केले.
हरित वसई संरक्षण समितीची त्यांनी स्थापना केली होती. या माध्यमातून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण रक्षण, जतन आणि संवर्धनाचे काम केले. राजकारणातील गुन्हेगारी विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. त्यांनी त्यांच्या एका पुस्तकाच्या लिखाणासाठी इस्राइलमध्ये काही काळ घालवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.