मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी ठाण्यातून विधानभवन येथे पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी जात होते. यावेळी त्यांना रस्त्यामध्ये दोन जैन साध्वी अडचणीत असल्याचं दिसलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून जैन साध्वींची मदत केली आहे. जैन साध्वींच्या गाडीचा घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर भागामध्ये अपघात झाला होता.
मुख्यमंत्र्यांनी आपली गाडी थांबवली आणि ते जैन साध्वींकडे विचारपूस करण्यासाठी गेले. अपघातामुळे साध्वी धक्यात गेल्या होत्या , घाबरलेल्या होत्या. मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलासा दिला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका जैन साध्वींच्या मदतीसाठी देऊ केली. रुग्णवाहिकेमधून जैन साध्वींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.
मुख्यमंत्री सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणालेत की, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी ठाणे येथून आज विधान भवनाकडे येत असताना घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगरजवळ आल्यावर दोन जैन साध्वींचा अपघात झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी जात त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांची गाडी अचानक उलटल्याने मोठी दुखापत झाली होती. तात्काळ माझ्या ताफ्यातील रुग्णवाहिका बोलावून त्यातून त्यांना रुग्णालयात दाखल केले.
मुख्यमंत्री शिंदे हे रस्त्यावरील अपघातवेळी मदतीसाठी धावण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा मुख्यमंत्र्यांनी अडलेल्यांची मदत केली आहे. २० मे रोजी शिंदेंनी अपघात झालेल्या एका महिलेची मदत केली होती. महिलेला रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे त्यांच्या तत्परतेची चर्चा आणि कौतुक होत असतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.