मुंबई

आजोबांची पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; अखेर गुन्हा दाखल

नातवाने व्हिडीओ शूट केल्यामुळे प्रकरण उघडकीस; सामाजिक दबाव पाहता पोलिसांनीच नोंदवला गुन्हा

विराज भागवत
  • नातवाने व्हिडीओ शूट केल्यामुळे प्रकरण उघडकीस; सामाजिक दबाव पाहता पोलिसांनीच नोंदवला गुन्हा

कल्याण (मुंबई): एक वृद्ध माणूस (Old Man) आपल्या पत्नीला लाथा-बुक्क्याने मारहाण (Inhumanely beating) करत असल्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या व्हायरल झालाय. तुम्हीदेखील हा व्हिडीओ नक्कीच पाहिला असेल. हा संतापाजनक (Shocking) प्रकार घडलाय कल्याण (Kalyan) जवळील द्वारली गावात... सुमारे आठवड्याभरापूर्वी हा व्हिडीओ शूट केल्याचं सांगितलं जातंय. एका वृद्ध माणूस आपल्या पत्नीला अतिशय वाईट पद्धतीने मारहाण करत असताना त्याच्या नातवाने हा व्हिडीओ शूट केला आणि त्यामुळे आजोबा करत असलेला हा अमानवी प्रकार उजेडात आला. घडलेला प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी आजीबाईंना तक्रार दाखल करण्यास सांगितले. पण त्यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याने अखेर सामाजिक दबाव लक्षात घेता पोलिसांनीच त्या माणसावर गुन्हा दाखल केला. (video goes viral as Old Lady in Kalyan beaten up inhumanely by his aged husband Case Registered)

गजानन चिकणकर बुवा असं या मारहाण करणाऱ्या आजोबांचं नाव आहे. एका घरगुती वादातून ते आपल्या पत्नीला जाब विचारत असल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय. इतकंच नव्हे तर आपल्या पत्नीला जाब विचारत असतानाही ते प्रचंड आक्रमक आवेशात बोलताना दिसत आहेत. पत्नीने आपल्याला उलट उत्तर केल्याच्या रागातून ते त्या वृद्ध महिलेला सुरूवातीला हाताने आणि लाथेने मारताना दिसतात. तर काही वेळाने राग अनावर झाल्यावर ते आपल्या पत्नीला चक्क प्लॅस्टिकच्या बादलीने मारहाण करतानाही दिसतात. व्हिडीओमध्ये पत्नी आपल्या पतीला वारंवार विनवणी करताना दिसते. रडत रडत ती आपल्या पतीला 'मला मारु नका' असं सांगतानाही दिसते. पण त्या विनवणीचाही चिकणकर बुवांवर काहीच परिणाम होत नाही. उलट ते काही वेळाने पुन्हा येऊन परत पत्नीला बादलीने मारहाण करतात.

व्हिडीओदरम्यान एक घरकाम करणारी महिला तेथेच उभी असलेली दिसते. पण ती ही मारहाण गपचूप पाहत असल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा आजीबाईंचा नातू मारहाण सुरू असताना 'बास झालं...' असं घाबरत घाबरत म्हणताना दिसतो. पण तोदेखील मारहाण थांबवायला येत नाही. पण त्याने रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमुळे चिकणकर बुवांची मात्र पोलखोल झाली. महिलेच्या नातवाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला. मे महिन्याच्या अखेरीस ही घटना घडली असल्याचं समजतंय.

अखेर गुन्हा दाखल...

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस चिकणकर बुवांच्या घरी गेल्याचंही वृत्त आहे. पण त्यावेळी चिकणकर बुवा काही दिवसांसाठी बाहेरगावी गेल्याचं त्यांना सांगितलं गेलं. तसेच, त्यांच्या पत्नीनेही कोणतीच तक्रार दाखल केली नसल्याने पोलिसांना कारवाई करता येत नसल्याचे चित्र होते. सुरूवातीला पोलिस चिकणकर बुवांना केवळ समज देणार असल्याची माहिती होती पण अखेर सामाजिक दबाव पाहता पोलिसांनी बुवांवर कलम 323, 324, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती हिललाईनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खांदारे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे यांच्या पराभवाची ५ कारणं; दोघांचं भांडण, महेश सावंतांचा लाभ

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: एकनाथ शिंदेंनी शब्द खरा करून दाखवला, विधानसभेतील 'ते' भाषण व्हायरल

SCROLL FOR NEXT