Indigo Airlines 
मुंबई

Mumbai Airport Video: रनवेवरच बसून प्रवाशांनी केलं जेवण! मुंबई विमानतळावरचं असं दृश्य तुम्ही कधी पाहिलं नसेल..

इंडिगोचं गोव्यावरुन दिल्लीला जाणारं विमान ऑपरेशनल अडचणींमुळं मुंबईला वळवण्यात आलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई विमानतळाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. असं दृश्य तुम्ही कधीही पाहिलं नसेल. कारण यामध्ये काही प्रवाशी रनवेवरच मांडी घालून बसले असून तिथंच ते आपल्या जवळचं जेवण करताना दिसत आहेत. या व्हिडिओत प्रवाशांच्या मागे इंडिगोचं विमान देखील दिसत आहे. (Video You have never seen such a scene at Mumbai airport Passengers had their meal sitting on runway itself)

इंडिगोचं काल (१४ जानेवारी) गोव्यावरुन दिल्लीला जाणारं विमान (6E 2195) ऑपरेशनल अडचणींमुळं मुंबईला वळवण्यात आलं होतं. पण या विमानानं पुन्हा गोव्याकडं उड्डाण करण्यास तब्बल १२ तासांहून अधिक तास लावले त्यामुळं विमानातील प्रवाशी अक्षरशः वैतागले होते. त्यामुळं त्यांनी थेट विमानातून खाली उतरत रनवेवरच ठाण मांडलं. तसेच आपल्यासोबत आणलेल्या खाण्यापिण्याच्या वस्तू तिथचं खोलल्या आणि एखाद्या गार्डनमध्ये बसून काही खातो त्याप्रमाणं त्यांनी रनवेवरच जेवण केलं. (Latest Marathi News)

मुंबई विमानतळाचं स्पष्टीकरण

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. प्रशासनानं म्हटलं की, "इंडीगो 6E 2195 (गोवा ते दिल्ली) प्रतिकूल हवामानामुळे वळवण्यात आलं होतं. गोव्यात उड्डाणाला आधीच बराच उशीर झाला होता, त्यामुळं प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी पायऱ्या विमानातून खाली उतरायला सुरुवात केली.

CISF आणि QRT च्या समन्वयाने विमानतळ चालकांनी प्रवाशांना सुरक्षा क्षेत्रामध्ये घेरलं कारण त्यांनी एअरलाइन कोचमध्ये जाण्यास तसेच टर्मिनल बिल्डिंगकडे जाण्यास नकार दिला. पुढील कारवाई होईपर्यंत प्रवाशांना एअरलाइन्स अधिकाऱ्यांच्या कडक नजरेखाली ठेवण्यात आले आणि सुरक्षेमध्ये ठेवण्यात आले" (Marathi Tajya Batmya)

डीजीसीएनं काढल्या एसओपी

या घटनेचा व्हिडिओ आज सोमवारी सोशल मीडियावर व्हायरलं झाला आहे. पण यामुळं अखेर डीजीसीएला देखील दखल घ्यावी लागली. या घटनेनंतर डीजीसीएनं विमानाला उशीर झाल्यास विमान कंपननं काय करायचं याच्या एसओपी जाहीर केल्या आहेत.

एसओपीत म्हटलं की, धुके किंवा इतर कारणांमुळे फ्लाईटला उशीर होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. असा प्रसंग ओढावल्यास प्रवाशांचा खोळंबा होतो. शिवाय मनस्ताप वेगळाच सहन करावा लागतो. यासंदर्भात प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावर तोडगा म्हणून DGCAने नवा नियम आणला आहे. याअंतर्गत विमानाला तीन तासांपेक्षा जास्त उशीर होण्याची शक्यता असेल, तर अशा परिस्थितीत एअरलाईन्सला फ्लाईट रद्द करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT