Maharashtra Vidhan Sabha 2024 Esakal
मुंबई

Vidhan Sabha 2024: "भाजप विषापेक्षा कमी नाही, हे विष महाराष्ट्राबाहेर फेकून दिले पाहिजे,’’ खर्गेंचा मुंबईतून हल्लाबोल

Maharashtra Vidhan Sabha 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या जोडीला दिल्लीतून महाराष्ट्र राज्य चालवू देऊ नका,’’ असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी जनतेला केले.

सकाळ वृत्तसेवा

‘‘राज्याला महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकारची गरज असून भाजपरुपी विष महाराष्ट्रातून हद्दपार करा. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या जोडीला दिल्लीतून महाराष्ट्र राज्य चालवू देऊ नका,’’ असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी जनतेला केले.

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेसच्या वतीने षण्मुखानंद सभागृहात सद्‍भावना दिवस व संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) अध्यक्ष उद्धव ठाकरे उपस्थित होते.

खर्गे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे महाराष्ट्र गहाण ठेवू नका. त्यांना दिल्लीतून महाराष्ट्र चालवायचा आहे. महाराष्ट्र दिल्लीतून नव्हे तर राज्यातील जनतेने चालवला पाहिजे. भारतीय जनता पक्ष हा विषापेक्षा कमी नाही, त्यासाठी हे विष काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राबाहेर फेकून दिले पाहिजे.’’ देशात हुकूमशाही सरकार बसण्यापासून महाराष्ट्रातील जनतेने लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना रोखल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले.

सरकार पडणार?

‘‘भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळाले असते तरी त्यांनी राज्यघटना बदलायला वेळ लावला नसता. पण हे अद्यापही संपलेले नाही. राज्यसभेचे खासदार निवडून आणण्यासाठी, राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी आमदारांचीसुद्धा गरज असते. राज्ये जिंकली नाहीत तर राज्यसभेचे खासदार निवडून आणता येणार नाहीत. राज्यसभेत बहुमत नसेल तर आम्ही राज्यसभेत घटनादुरुस्ती कशी थांबवू शकतो?,’’ असा सवाल खर्गे यांनी केला. हे सरकार फार काळ चालणार नाही लवकरच पडेल," अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

तिकीट कापण्याचा इशारा

सद्‍भावना दिवस संकल्प मेळाव्यात काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही कार्यकर्ते ऐकत नसल्याने संतापलेल्या नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांना थेट तिकीट कापण्याचा इशारा दिला.

पवार-ठाकरेंच्या गळी काँग्रेसचे उपरणे

या कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरे आणि नेते संजय राऊत यांच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचे उपरणे घातले. त्यानंतर शरद पवार या कार्यक्रमास आले. सुरूवातीला पवारांनी काँग्रेसचे उपरणे घालण्यास नकार दिला. काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी गळ्यातील उपरणे काढून बाजूला ठेवले.

गळ्यातून उपरणे काढल्यानंतर त्यांनी याबाबत स्पष्टीकरणही दिले. ‘‘काँग्रेसचे उपरणे गळ्यात घातल्याचा माझे छायाचित्र उद्या सर्वत्र येईल. त्यासाठीच मी ते घातले असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी ते उपरणे गळ्यातच ठेवावे असा आग्रह उद्धव ठाकरेंना केला. मात्र उद्धव ठाकरे यांनी हसत हसत त्याला नकार दिला. संजय राऊत यांनी मात्र त्यांच्या गळ्यातील उपरणं कायम ठेवले. काही वेळाने शरद पवारांनीही काँग्रेसचे उपरणे गळ्यात घातले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT