local sakal
मुंबई

Mumbai News : विद्याविहार स्थानकांत आज पॉवर ब्लॉक! मेल- एक्सप्रेससह लोकल गाड्यांना बसणार फटका!

विद्याविहार रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी मध्य रेल्वेने विद्याविहार स्थानकादरम्यान शनिवार- रविवारी विशेष रात्रकालीन वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - विद्याविहार रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी मध्य रेल्वेने विद्याविहार स्थानकादरम्यान शनिवार- रविवारी विशेष रात्रकालीन वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मेल - एक्सप्रेस आणि लोकल ट्रेनच्या वाहतुकीत बदल करण्यात येणार असून काही लोकल रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकात मुंबई महानगरपालिकेद्वारे पूर्व ते पश्चिम दिशेने "एन " वॉर्डमधील एलबीएस मार्ग ते आरसी मार्ग जोडणारा रोड ओव्हर पुल बांधण्यात येत आहे.यापुलाचा दुसरा ओडब्लूजी स्पॅन शनिवारी रात्री लॉन्च करण्यात येणार आहे.

याकरिता कुर्ला ते भांडुप स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धिम्या आणि जलद मार्गावर तसेच पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री १.१० ते रविवारी पहाटे ४.२० दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान शनिवारी रात्री कुर्ला ते ठाणे दरम्यानची लोकल वाहतुक पुर्णपणे बंद राहणार आहे. तसेच सीएसएमटी स्थानकातून रात्री ११.४७वाजता सुटणारी ठाणे लोकल रद्द केली आहे.

रविवारी मध्य रात्री २.३३ वाजताची कर्जतहून सीएसएमटीकरिता सुटणारी लोकल ठाणे स्थानकापर्यतच धावणार आहे. पहाटे ५.१६वाजताची सीएसएमटी-अंबरनाथ लोकल ठाणे स्थानकातून चालविण्यात येईल. तसेच पहाटे ४ आणि ४.१६ची ठाणे- सीएसएमटी लोकल रद्द केल्या आहेत.

मेल-एक्सप्रेसला फटका

ब्लॉकदरम्यान ट्रेन क्रमांक ११०२० भुवनेश्वर-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक १८०३० शालिमार-एलटीटी एक्स्प्रेस ठाणे स्थानकापर्यतच चालविण्यात येणार आहे. तसेच १२८१० हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस दिवा स्थानकात अप जलद मार्गावर पहाटे ३.३५ ते ४.२० वाजेपर्यत थांबविण्यात येणार असून दादर स्थानकापर्यतच चालविण्यात येणार आहे. १२१३४ मंगळुरु-सीएसएमटी एक्सप्रेस पनवेल स्थानकापर्यतच धावणार आहे.

मुंबई येणाऱ्या गाडयांना होणार उशीर

ट्रेन क्रमांक १८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस कल्याण स्थानकात पहाटे ३.२९ ते ४.०५ वाजपेर्यत उभी करण्यात येणार असल्याने आपल्या गंतव्य स्थानी १ तासाने उशिरा पोहोचेल. तर ट्रेन क्रमांक २०१०४ गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२७०२ हैदराबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस अंबरनाथ, ट्रेन क्रमांक १११४० गडग-सीएसएमटी एक्सप्रेस आपल्या गंतव्यस्थानकात ३० मिनिटे उशिराने येतील.याशिवाय इतर मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT