विक्रमगड (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील 21 डिसेंबर रोजी झालेल्या 14 जागांसाठी विक्रमगड नगरपंचायतीच्या राज्य निवडणुक आयोगाच्या सार्वत्रीक निवडणुकीत 14 प्रभागात विक्रमगड विकास आघाडी- 14, भाजपा - 11 उमेदवार, राष्ट्रवादी-7, शिवसेना -9, काँग्रेस-3, मनसे - 2, अपक्ष-2 असे एकूण 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.(Vikramgad Nagar panchayat election)
विक्रमगड विकास आघाडीने आपले 14 जागा पैकी 13 जागेवर विजय मिळवत आपली सत्ता राखली आहे. या आधीच विक्रमगड विकास आघाडीने 3 उमेदवार बिनविरोध करून सर्व पक्षाना धक्का दिला होता. नगपंचायतीच्या 17 प्रभागामध्ये शिवसेनेलाच एक सीट राखण्यात यश आले आहे. या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा यांनी निलेश सांबरे यांच्या विक्रमगड विकास आघाडीला शह देण्यासाठी पराकाष्ठा केली होती. विक्रमगड नगरपंचायत मधील राष्ट्रवादीचा लाजिरवाणा पराभव आमदार सुनिल भुसारासाठी मोठा धक्का मानला जातो. तर विक्रमगड विकास आघाडीच्या माजी नगरध्यक्षा प्रतिभा पडवळे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपा मध्ये प्रवेश करून प्रभाग क्रमांक 8 मधुन भाजप पक्षा कडून निवडणुक लढवली होती. मात्र त्यांना ही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
प्रभाग क्रमांक 1 मधील शिवसेनेच्या उमेदवार सोनल सुरेश गवते यांनी विजय मिळवत एक जागेवर शिवसेनेला समाधान मानावे लागले आहे. विक्रमगड विकास आघाडीचे माजी उपनगरध्यक्ष निलेश रमेश पडवळे हे प्रभाग क्रमांक 4 मधुन 237 मतांनी विजय मिळवला आहे. विक्रमगड विकास आघाडीचे विक्रमगड नगरपंचायतचे माजी बांधकाम सभापती महेंद्र तुकाराम पाटील यांनी प्रभाग क्रमांक 16 मधुन विजय झाले आहेत. दरम्यानच्या काळामध्ये 14 प्रभागातुन विक्रमगड विकास आघाडी-श्रमजिवी संघटना युतीने 13 जागा तर शिवसेनेने 1 जागा जिंकल्या आहेत. तर निवडणुकी आधीच विक्रमगड विकास आघाडीचे 3 उमेदवार बिनविरोध झाल्याने 17 जागा पैकी 16 जागेवर उमेदवार जिंकले आहेत तर एके काळी भाजपचा बालेकिल्ला असलेला विक्रमगड मध्ये भाजप भुईसपाट झाली असुन. राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत एक उमेदवार विजयी झाला होता. मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीला एक ही जागा जिंकता न आल्याने या पराभवाचा तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षावर दूरगामी परिणाम होणार आहे. तर मनसे,काँग्रेस,अपक्ष यांना एक ही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही त्यांचे अस्तित्वच मतरांनी नाकारले आहे.
विक्रमगड नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल भाजप व राष्ट्रवादीच्या दृष्टिने धक्कादायक लागलेले आहेत. मात्र गेल्या निवणुकींच्या मानाने या नगपंचायतीच्या निवडणुकीत मतदारांनी भरघोस प्रतिसाद दिल्याने 79.34 टक्के मतदान झाले व याचा परिणाम स्पष्ट जाणवला आहे. दरम्यान आता विक्रमगड विकास आघाडीकडे 16 जागा जिंकल्याने विक्रमगड विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे विक्रमगड विकास आघाडी विक्रमगड नगर पंचायतवर सत्तास्थापन करेल. नगरअध्यक्षपदी कोणाच्या गळ्यात माळ पडेल हयाकडे सवाचे लक्ष लागुन राहाणार आहे.
''विक्रमगड नगरपंचायत मध्ये विक्रमगड विकास आघाडीने केलेल्या विकास कामामुले विक्रमगडच्या जनतेने आम्हला कौल दिला आहे. विक्रमगडच्या आमदाराच्या राजकारणाला जनता कंटाळी असुन, विक्रमगडच्या जनतेने भाजपच्या स्थानिक नेत्यांना व आमदारांना सपशेल नाकारले आहे. सामाजिक काम व जनतेचा विकास हेच आमचे ब्रीद वाक्य आहे.''- निलेश सांबरे - (विक्रमगड विकास आघाडी)
''नगरपंचायत क्षेत्राचा विकास हा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीत उतरलो होतो. आमच्या विकास कामांमुळे जनतेने आम्हांस पसंत दिली आहे.आज 16 जागांवर विजय प्राप्त झाल्याने आम्ही विक्रमगड नगरपंचायतीमध्ये आमचा नगरअध्यक्ष बसेल. तसेच आमच्यावर मतदारांनी जो विश्वास टाकलेला आहे.त्यांच्या विश्वासाला तडा जावु देणार नाही व भरघोस अशी जाहिर नाम्यामध्ये दिलेली सर्व विकास कामेे करु कोणत्याही प्रभागातील जनतेला नाराज करणार नाही. असे आश्वासन देतो.''- निलेश पडवळे (माजी उपनगरध्यक्ष, विक्रमगड विकास आघाडी)
''ज्या दिवशी निवडणुका जाहीर झाल्या त्या दिवशी आमचे जिल्हा अध्यक्ष व आमदार सुनिल भुसारा हे भाजप तालुका अध्यक्षाच्या घरी फेऱ्या मारू लागले त्याच वेळी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्याचे मनोधैर्य खचले राष्ट्रवादी पक्ष मोठा करता येईल की भाजप पक्ष मोठा करता येईल याची कल्पना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आली व त्याचे मनोधैर्य खचल्याने राष्ट्रवादीचा पराभव झाला.'' - ज्ञानेश्वर सांबरे (राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषद उपाध्यक्ष)
यापुर्वी 2011 मध्ये निवडून आलेले उमेदवार ग्रामपंचायत स्थिती---
सन-2011 च्या विक्रमगड ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा-सेना युतीच्या 15 चे 15 सदस्य निवडुन देवुन एकहाती सत्ता मतदारांनी सोपविली होती. 2016 च्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपाच्या बालेकिल्ल्यांला सुरुंग लावला आहे.17 प्रभागातुन फक्त भाजपा-2 व शिवसेना -1 राष्ट्रवादी -1, जागृत पॅनल -6, विक्रमगड विकास आघाडी-काँग्रेस युती -7 अशा जागांवर समाधान मानावे लागले होते.
विक्रमगड नगरपंचायतीमधील विजयी उमेदवारांची प्रभाग निहाय तक्ता.
प्रभाग क्र. 1 (अ.ज.स्री) 1)गवते सोनल सुरेश - धनुष्यबाण - 206 (शिवसेना)
प्रभाग क्र. 2 ( अ. ज) 1) वाघ मनोज विलास- कपबशी (विक्रमगड विकास आघाडी -144
प्रभाग क्र. 3 (अ.ज.स्री) 1) भडांगे चंद्रशील अमोल- कपबशी -117 (विक्रमगड विकास आघाडी)
प्रभाग क्र.4 ( सर्वसाधारण) 1) पडवळे निलेश रमेश - कपबशी-237 (विक्रमगड विकास आघाडी)
प्रभाग क्र. 5 (अ.ज.स्री) 1) माडी जोत्सना योगेश - कपबशी- 105 (विक्रमगड विकास आघाडी)
प्रभाग क्र. 6 ( अ. ज.) 1) महाला जयश्री पांडूरंग - कपबशी - 157 (विक्रमगड विकास आघाडी)
प्रभाग क्र. 7 ( सर्वसाधारण स्री) 1) डंबाळी पुष्पा मोहन - बिनविरोध (विक्रमगड विकास आघाडी)
प्रभाग क्र.8 (सर्वसाधारण स्री) 1 ) बांडे भारती रमेश - कपबशी - 144 (विक्रमगड विकास आघाडी)
प्रभाग क्र. 9 ( अ. ज. स्री) 1) सांबर माधुरी विष्णू- कपबशी -114 (विक्रमगड विकास आघाडी)
प्रभाग क्र. 10 (अ. ज.) 1 ) तामोरे वैशाली गणेश- कपबशी- 155 (विक्रमगड विकास आघाडी)
प्रभाग क्र.11(अ. ज) 1) भडांगे अमोल दिलीप - बिनविरोध (विक्रमगड विकास आघाडी)
प्रभाग क्र.12 ( अ. ज.) 1) मेघवाली विजय विठ्ठल- कपबशी -152 (विक्रमगड विकास आघाडी)
प्रभाग क्र.13 ( अ. ज. स्री) 1) लोहार अर्चना श्याम - कपबशी - 175 (विक्रमगड विकास आघाडी)
प्रभाग क्र.14 ( अ. ज. स्री) 1) कनोजा किर्ती सुरेश- बिनविरोध (विक्रमगड विकास आघाडी)
प्रभाग क्र.15 (सर्वसाधारण) 1) भावर अमित जान्या - कपबशी- 140 (विक्रमगड विकास आघाडी)
प्रभाग क्र.16( सर्वसाधारण) 1) पाटील महेंद्र तुकाराम - कपबशी - 217 (विक्रमगड विकास आघाडी)
प्रभाग क्र.17 ( अ. ज. स्री) 1) महाला निमा अंकुश - कपबशी - 154 (विक्रमगड विकास आघाडी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.