मुंबईः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वसई- विरार, नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरु आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच विरारमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. विरार पूर्व कणेर परिसरात एका गॅरेजच्या गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून 3 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत विरार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
विरार पूर्व कणेर राई पाडा परिसरात बिपीन राऊत यांचे सिद्धेश नावाचे गॅरेज आहे. याच गॅरेजमध्ये काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांची 3 वर्षांची आराध्या ही नात खेळता खेळता गाडी धुण्याच्या रॅम्पच्या खड्ड्याजवळ पोहोचली. रॅम्पमध्ये पाणी पाहून ती खेळण्यासाठी पाण्यात उतरली. खड्ड्यात पाणी जास्त असल्याने ती खड्ड्यात पडली आणि यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
आराध्या खेळत असताना सुरक्षारक्षक तिचे आजोबा आणि कुटुंबीय त्याच्या घरात झोपले होते. पावसामुळे या रॅम्पमध्ये सतत पाणी जमा होऊन राहते. टाळेबंदी असल्याने गॅरेज बंद होते. तसेच आसपास जवळ कुणी राहत नसल्याने कुणाला तिच्या ओरडण्याचा आवाज आला नाही. जेव्हा तिला शोधण्यासाठी बाहेर पडले तेव्हा ती गॅरेजच्या रॅम्पच्या गाडी धुण्याच्या खड्ड्यात आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात नेयात आले. पण डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
या संदर्भात कुणाची तक्रार नसल्याने विरार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून, पुढील तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे.
(संपादनः पूजा विचारे)
Virar 3 year old baby girl drowned into garage ramp
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.