मुंबई: विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली. या आगीत १३ कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ही दुर्घटना दुर्देवी आहे. या दुर्घटनेत एक अशी घटना घडली की ऐकून मन सुन्न होतं. मृतांमध्ये पाच महिला तर ८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील एक महिला बरी झाली होती मात्र काळानं त्यांच्यावर घाला घातला असंच बोलावं लागेल. या महिलेच्या मुलीनं मन हेलावून टाकेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
या आगीत क्षमा अरुण म्हात्रे या महिलेचे मृत्यू झाला. तिच्या मृत्यू मुळे तिचे तीन लहान मुलं मात्र अनाथ झाले आहेत. तिच्या पश्चात १ मुलगा आणि दोन मुली पोरक्या झाल्या.
वसई तालुक्यातील मच्छीमारांचे गाव म्हणून कळंब हे गाव ओळखले जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या गावातील क्षमा म्हात्रे ही पहिली रुग्ण ठरली होती. तिच्यावर विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात गेल्या एक महिन्या पासून उपचार सुरू होते. कोरोना मधून ती बरी ही झाली होती आणि आज तिला रुग्णालयातून डिस्चार्ज येणार होतं. दुर्देवाने पहाटे रुग्णालयाला लागलेल्या आगीत तिचा मृत्यू झाला. क्षमा म्हात्रे ही 45 वर्षाची होती तिला दोन मुली आणि एक मुलगा असून ते आता अनाथ झालेत. कळंब गावावर या घटनेनं शोककळा पसरली आहे.
-----------------------------
(संपादन- पूजा विचारे)
virar hospital fire woman died who had recovered from corona
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.