Vishalgad violence esakal
मुंबई

Vishalgad violence: धुक्यामुळे कारवाई करण्यात अडचणी आल्या; विशाळगडावर हिंसाचार प्रकरणी राज्य सरकारचा न्यायालयात अजब दावा

Sandip Kapde

मुसळधार पावसामुळे कायदा-सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांवरील कारवाईत अडचणी आल्याचा दावा राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. विशाळगड परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता आणि धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे त्या दिवशी गड परिसरात आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात अडचणी आल्याचे सांगण्यात आले आहे.

गुन्हे दाखल-

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, पुण्यातील हिंदू बांधव समितीचे रवींद्र पडवळ यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली.


पोलीस कारवाई-

कोल्हापूर पोलिसांनी प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, १३ जुलै रोजी दोन पोलीस निरीक्षकांसह पोलिसांचा ताफा विशाळगडावर तैनात होता. यावेळी मुसळधार पाऊस, धुके आणि कमी दृश्यमानतेमुळे, काहीजण गजापूर गावात शिरले आणि संपत्तीची नासधूस केली. परिणामी गड परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.

पोलिसांचा गोंधळ -


१४ जुलै रोजी बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्यादिनी अनेकजण विशाळगडाकडे जातात. त्यामुळे लोकांना परवानगी द्यायची की नाही या गोंधळात अधिकारी होते, ज्यामुळे हिंसाचार झाला.

न्यायालयीन सुनावणी-

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.पी. कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. शाहुवाडी पोलिसांतर्फे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली आहे, परंतु रवींद्र पडवळ फरारी आहेत. राज्य सरकारतर्फे ॲड. जनरल डॉ. बीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली, तर ज्येष्ठ वकील ॲड. सतीश तळेकर, ॲड. माधवी अय्यपन यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Amit Thackeray: अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला; पण मुंबईतला नाही तर...

Jarange Health Update: उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांनी केल्या कडक शब्दांत सूचना

Latest Marathi News Updates : भाजपशासित सर्व राज्यांमध्ये प्रसादाची तपासणी करावी: मंत्री प्रियांक खर्गे

IND vs BAN: अ‍ॅक्शन रिप्ले! Rohit Sharma दुसऱ्या डावातही फसला; एकाच पद्धतीने पुन्हा OUT झाला, जैस्वालही गंडला

Share Market Closing: आठवड्याच्या शेवटी शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्सने 1400 अंकांनी वाढला, निफ्टी 25,800च्या वर

SCROLL FOR NEXT