vishvanath bhor  sakal
मुंबई

Vishvanath Bhoir: केडीएमसीसाठी कुशीवली धरण आरक्षित करा

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Kalyan: ठाणे जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी स्वतंत्र धरणाची आवश्यकता असतानाच याच जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा देखील चोहो बाजुनी विस्तार होत आहे. केडीएमसी क्षेत्रातील नागरिकांची पाण्याची गरज भागवण्यासाठी अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली धरण आरक्षित करण्यात यावे. अशी आग्रही मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून यामध्ये आमदार भोईर यांनी कल्याण डोंबिवलीच्या पाणी प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधत त्यासाठी कुशीवली धरण आरक्षित करण्याची गरज व्यक्त केली.

कल्याण डोंबिवली शहराचा गेल्या दशकात चेहरामोहरा बदलला आहे. या भागांत मोठमोठी गृहसंकुल उभी राहिली असून आणखी मोठे प्रकल्प येथे सुरू आहेत. या गृह संकुलांमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक वास्तव्यास आले आहेत. त्यांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. अनेक बड्या गृह संकुलात पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

सध्या कल्याण डोंबिवली महापालिकेकडून उल्हास नदीतून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया करून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र सध्याची लोकसंख्या आणि भविष्यातील गरज पाहता पाण्याचे हे प्रमाण आताच तोकडे पडू लागले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी कुशवली धरण आरक्षित करण्याची गरज ठळक मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी अधिवेशन काळात केली आहे.

दोनच दिवसांपूर्वी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अटाळी वडवली परिसरातील नागरिकांनी प्रभाग क्षेत्र कार्यालयावर हंडा मोर्चा काढत मुबलक पाणीपुरवठ्याची मागणी केली होती. त्याचा दाखला देत आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की केवळ याच ठिकाणी नव्हे तर टिळक चौक, पार नाका, बेतुरकर पाडा, रामबाग, जोशी बाग, उंबर्डे अशा प्रत्येक भागामध्येही ऐन पावसाळ्यात पाण्याची चणचण भासत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना मंजूर करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे आमदार भोईर यांनी यावेळी अधोरेखित केले.

तर कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी स्वतंत्र धरणाच्या मागणीसाठी आमदार विश्वनाथ भोईर सतत पाठपुरावा करत असून हे धरण आरक्षित करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणातील जाहीर कार्यक्रमात केली होती. त्यापार्श्वभूमीवर डिसेंबर 2023 मध्ये ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महापालिका आयुक्त जलसंपदा विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊनही प्रशासन स्तरावर कोणतीही कार्यवाही न झाल्याबाबत आमदार भोईर यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली.

तसेच सद्यस्थितीतील पाण्याची समस्या सोडवण्यासह भविष्यातील लोकसंख्येला पुरेसे पाणी मिळण्यासाठी कुशिवली धरण कल्याण डोंबिवली महापालिकेकडे आरक्षित करण्याची कार्यवाही शासनाने लवकरात लवकर करावी अशी आग्रही मागणी आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT