PM Modi  Sakal
मुंबई

PM Modi : विकसित आणि सशक्त भारतासाठी महायुतीला मतदान करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कल्याणमध्ये आवाहन

सकाळ वृत्तसेवा

कल्याणः राष्ट्रकल्याणासाठी मी कल्याणकरांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून भारत आज नव्या जोमाने विकास करत आहे. त्यामुळे तुम्ही कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे आणि भिवंडी मतदार संघातून कपिल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा.

तुम्ही विकसित आणि सशक्त भारत करण्यासाठी मतदान करा, असे आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज व्हर्टेक्स मैदानात आयोजित महाविजय संकल्प सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

तर यावेळी शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य करण्याचे काम आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब करत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कल्याणच्या या सभेत महायुतीच्या नेत्यांनी महाविजयाचा संकल्प केला.

तुमची स्वप्न हे मोदीजींचा संकल्प आहे आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या आयुष्यातले क्षण तुमच्यासाठी समर्पित करतो. काँग्रेस कधीच विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जाऊ शकत नाही. कारण काँग्रेसला फक्त हिंदू आणि मुसलमान याच मुद्द्यांमध्ये रस आहे, असा घणाघात यावेळी नरेंद्र मोदी यांनी केला.

मला माझ्या प्रतिमेपेक्षा भारताची एकता महत्त्वाची वाटते. पावला पावलांवर देशाचे तुकडे करण्याचा विचार करणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. काँग्रेस पाकिस्तान आणि आतंकवाद्यांचे समर्थन करते व नकली शिवसेना त्यांच्यासोबत उभी आहे, अशीही टिका त्यांनी यावेळी केली.

काँग्रेसच्या राजकुमाराने छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकरांचा अपमान केला आहे. तरीसुद्धा नकली शिवसेना त्यांच्या मांडीला मांडी लावून बसली आहे, असाही आरोप यावेळी मोदी यांनी केला. तुम्ही कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिलेले मत माझ्यासाठी असेल.

त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातून डॉ. श्रीकांत शिंदे आणि भिवंडी मतदारसंघातून कपिल पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन मोदी यांनी यावेळी केले. तुम्हाला विकसित आणि सशक्त भारत करण्यासाठी मतदान करायचे आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदीजी हे जनतेच्या हृदयातले पंतप्रधान आहेत. मोदीजींसारखे पंतप्रधान यापूर्वी झाला नाही आणि यापुढेही होणार नाहीत, असे गौरवोद्गार काढले.

मोदी साहेब भारताचा अभिमान आणि गौरव आहेत. मोदीजींना भेटल्यावर मला हरीशवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या काही ओळी आठवतात असे सांगत एकनाथ शिंदे यांनी, 'तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुडेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ!' या ओळी म्हटल्या.

२०१४ पूर्वी या देशाचा पंतप्रधान एकदा तरी कल्याणमध्ये आला होता का? असा प्रश्न करत त्यांनी २०१४ नंतर मोदीजी तीनदा या कल्याणमध्ये आले. हे आपल्या सगळ्यांचे भाग्य आहे, असे सांगितले. तर मोदीजींच्या आशीर्वादाने कपिल पाटील आणि डॉ. श्रीकांत शिंदे हॅटट्रिक करतील, असा विश्वास मी व्यक्त करतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार संजय केळकर, आमदार किसन कथोरे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपचे नेते, पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

आमची हॅटट्रिक नक्की - डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे

लोकसभेची निवडणूक तिसऱ्यांदा लढवत आहे. त्याच्या प्रचारार्थ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा कल्याणमध्ये आल्याने प्रचंड बहुमताने आमची हॅटट्रिक तिसऱ्यांदा होणार आहे, असे मत कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडले.

गेल्या १० वर्षात पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभा मतदारसंघात रेल्वे, मेट्रो, जलवाहतूक सेवा आणि आरोग्य सुविधा या सगळ्या गोष्टी करू शकलो. माझ्या कल्याण लोकसभेत गेल्या दहा वर्षात रेल्वे सुविधा उभारण्यासाठी २ हजार कोटी रुपयांचा निधी आला. पाचवी सहावी मार्गिका सुरू झाली. रेल्वेत अतिरिक्त सुविधा मिळाल्या.

रेल्वे संबंधी कामे केली आणि त्याचा आज प्रवाशांना फायदा होत असल्याचे समाधान आहे, असेही डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. कल्याण लोकसभेमध्ये रस्त्याच्या कामांसाठी राज्याच्या नगर विकास, एमएमआरडीए, एमएसआरडीसीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचा निधी आणू शकलो.

कल्याण लोकसभा मतदारसंघात मेट्रोचे स्वप्न पाहिले होते आणि आज ५ हजार कोटी रुपयांचा मेट्रो प्रकल्प कल्याण लोकसभा मतदारसंघात येऊन त्याचे काम देखील सुरू झाले आहे, असेही डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले. विश्वासाचे दुसरे नाव म्हणजे नरेंद्र मोदी, विकासाचे दुसरे नाव देखील नरेंद्र मोदीच, असेही गौरवोद्गार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी काढले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT