grapes and strawberry sakal
मुंबई

Washi News : वाशी बाजारपेठेत स्ट्रॉबेरीची आवक वाढली; काळी द्राक्षही बाजारात दाखल

नवी मुंबईतील कृषिउत्पन्न बाजार समितीत स्ट्रॉबेरीची आवक वाढल्याचे चित्र असून स्ट्रॉबेरीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाशी - नवी मुंबईतील कृषिउत्पन्न बाजार समितीत स्ट्रॉबेरीची आवक वाढल्याचे चित्र असून स्ट्रॉबेरीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. अवकाळी पावसाच्या फटक्यानंतरही स्ट्रॉबेरी नवी मुंबई बाजारपेठेत मुबलक प्रमाणात दाखल झाली असून स्ट्रॉबेरीच्या किमतीतही घट झालेली दिसत आहे. घाऊक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या स्ट्रॉबेरीची किंमत प्रति किलो ४० ते १०० रुपये आकार आणि गुवत्तेनुसार आकारली जात आहे.

घाऊक बाजाराच्या किमतीपेक्षा किरकोळ बाजारात स्ट्रॉबेरीची किंमत जास्त मोजावी लागत असून किलोमागे ८० ते १५० रुपये मोजावे लागत आहेत अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरदिवशी बाजारात ५० ते ७० टन स्ट्रॉबेरी येत असून ही आवक वाढण्याची शक्यता आहे. परिणामी स्ट्रॉबेरीच्या किमतीत येत्याकाळात आणखी घट होईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

काळी द्राक्षेही बाजारात दाखल

महाराष्ट्रात थंडी वाढल्याने स्ट्रॉबेरीसह द्राक्षांनाही पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पावसाचा उत्पादनावर काहीप्रमाणात परिणाम जाणवत असला तरीही द्राक्षे लवकर काढल्याने शेतकऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात टळलेले पहायला मिळत आहे. बाजारात काळ्या द्राक्षांची आवक चांगल्याप्रमाणात होत असून दिवसाला ४० ते ५० गाड्या मुंबई कृषिउत्पन्न बाजार समितीत येत आहेत.

मात्र आवकाप्रमाणे उठाव मिळत नसल्याने द्राक्षांचे भाव कमी आहेत. बाजारात द्राक्षांच्या शरद सीडलेस, जंबो, जेट्टी आणि कृष्णा अशा चार जाती उपलब्ध असून त्यातील जंबो आणि कृष्णा द्राक्षांना ७० ते १०० रुपये प्रतिकिलो इतका भाव आहे तर इतर द्राक्षांना ४० ते ५० रुपये प्रतिकिलो इतका भाव आहे.

'अवकाळी पावसाचा फटका सर्वच पिकांना कमी जास्त प्रमाणात बसलेला आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पन्नावर आणि गुणवत्तेवर याचा परिणाम जाणवून येत आहे. मात्र बाजारात आवक समाधानकारक होत असल्याने व्यापारी निश्चिंत आहेत.'

- संतोष चव्हाण, व्यापारी, वाशी बाजारपेठ

'बाजारात विकायला आणलेल्या मालाच्या उत्पादनावर लागणारा एकूण खर्च आणि विक्रीची दर यात जास्त फरक नसल्याने महागाईचा फटका लहान शेतकऱ्यांना बसत आहे. खतांचे भाव वाढल्याने शेती मालाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. खतांचे भाव आटोक्यात आणले तर शेतकऱ्यांना मदत होईल व चारपैसे आम्हालाही जास्तीचे मिळतील. याकडे सरकारने लक्ष द्यावे.'

- राजू मुरकुटे, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT