Water Cut in Bandra and khar region of mumbai peole should take care of water  sakal
मुंबई

Mumbai: मुंबईकरांनो लक्ष द्या, 'या' भागात शुक्रवारी होणार नाही पाणीपुरवठा!

Mumbai Water News: खबरदारीचा उपाय म्हणून चार ते पाच दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Latest Mumbai News: खार पश्चिमेतील पाली हिल जलाशय एकची जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी हटवण्याचे, तसेच वांद्रे पश्चिमेतील आर. के. पाटकर मार्गावरील नव्याने टाकलेली मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याची कामे शुक्रवारी (ता. ३०) करण्यात येणार आहेत.

या दिवशी सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ही कामे सुरू राहणार असून या काळात एच-पश्चिम विभागातील वांद्रे आणि खारच्या काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. (water supply to some parts of Bandra and Khar in H-West Division will be shut off)

वांद्रे पश्चिमचा काही भाग, वरोडा मार्ग, हिल रोड, मॅन्युअल गोन्सालविस मार्ग, पाली गावठाण, कांतवाडी, शेरली राजन मार्ग, खारदांडा कोळीवाडा, दांडपाडा, चुईम गावठाण, खार पश्चिमेचा काही भाग, गझदरबंध झोपडपट्टीचा काही भाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गालगतचा परिसर, पेस पाली गावठाण, पाली पठार आदी भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या परिसरातील नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करावा. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून चार ते पाच दिवस पाणी गाळून आणि उकळून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

(Part of Bandra West, Waroda Marg, Hill Road, Manual Gonsalves Marg, Pali Township, Kantwadi, Sherli Rajan Marg, Khardanda Koliwada, Dandpada, Chuim Township, Part of Khar West, Part of Ghazdarbandh Slum, Dr. Water supply will be shut off in the area along Babasaheb Ambedkar Marg, Paes Pali Gavthan, Pali Plateau)

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT