मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा प्रामुख्याने वैतरणा धरणातून होतो. ठाणे जिल्ह्यातील तारळी येथे वैतरणा धरणातून पाणी आणणाऱ्या पाइपलाइन यंत्रणेचा ९०० मिमीचा व्हॉल्व्ह बिघडला आहे. त्यामुळे जलवाहिनी अर्धवट बंद पडल्याने मुंबईकरांना पुढील दोन दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेने ही माहिती दिली आहे. तसेच पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
एका प्रसिद्धीपत्रकात बीएमसीने म्हटले आहे की, वैतरणा धरणातून ही पाइपलाइन पाणीपुरवठा करते. बिघाडामुळे मुंबई शहर आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारा प्रवाह कमी झाला आहे . व्हॉल्व्हमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत. दुरुस्तीच्या कामाला सुमारे ४८ तास लागतील. त्यामुळे गुरुवार, १७ ऑक्टोबर ते शुक्रवार, १८ ऑक्टोबरपर्यंत मुंबईतील पाणीपुरवठ्यात ५ ते १० टक्के कपात होणार आहे.
यासोबतच बीएमसीच्या नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पाण्याची आगाऊ साठवणूक करावी आणि गरजेनुसार त्याचा जपून वापर करावा. मुंबई महानगरपालिका प्रशासन सर्व नागरिकांना या काळात पाणी वाचवून सहकार्य करण्याचे आवाहन करत असल्याचे बीएमसीने म्हटले आहे. गेल्या मंगळवारी बीएमसीने सांगितले की, शहराला पिण्यायोग्य पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील सात जलाशयातील पाण्याची पातळी ९७.८५ टक्क्यांवर पोहोचली आहे. बीएमसीच्या आकडेवारीवर आधारित, मुंबईतील तलावांचा एकत्रित पाणीसाठा १४,१६,१९४ दशलक्ष लिटर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.