Diva Public Agitation for Water Issue sakal
मुंबई

Water Issue : बेडेकर नगर रहिवाशांचा सहाय्यक आयुक्तांना घेराव! पाणी समस्या 8 दिवसात न सोडवल्यास प्रभाग समितीसमोर उग्र आंदोलन करणार

गेल्या काही महिन्यांपासून दिवा पूर्वेतील बेडेकर नगर येथील नागरिक पाण्याच्या समस्येने खूप त्रस्त झाले.

सकाळ वृत्तसेवा

दिवा - गेल्या काही महिन्यांपासून दिवा पूर्वेतील बेडेकर नगर येथील नागरिक पाण्याच्या समस्येने खूप त्रस्त झाले असून, वारंवार लेखी पत्रव्यवहार करूनही महापालिकेचे अधिकारी त्याची दखल घेत नसल्याने त्यांनी आज दिवा मनसेच्या प्रभाग ४५च्या पदाधिकाऱ्यांसोबत दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना घेराव घातला.

त्यावेळी ही समस्या आठ दिवसांत न सुटल्यास दिवा प्रभाग समिती समोर उग्र आंदोलन करण्यात येईल असे, नागरिकांनी आणि मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांना सांगितले.

बेडेकर नगर मधील चाळीतील रहिवाशांना गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून तीव्र पाणी समस्या आहेत. त्यासाठी तेथील महिला, नागरिक यांचा दिवा प्रभाग समितीतील पाणी अधिकाऱ्यांशी सततचा पाठपुरावा सुरु आहे. पालिका अधिकाऱ्यांना वारंवार लेखी पत्रव्यवहार करूनही ते अधिकारी त्याची दखल घेत नसल्याने आज दिवा मनसेच्या प्रभाग ४५ च्या पदाधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना घेराव घातला.

त्यावेळी आयुक्तांना पाणी समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले. तसेच येत्या 8 दिवसात हा पाणी प्रश्न न सुटल्यास दिवा प्रभाग समिती समोरच उग्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी आणि मनसेने दिला आहे.

दिव्यातील बेडेकर नगर हे दिवा स्टेशनपासून 4 ते 5 किलोमीटर एव्हढे लांब आहे. रोज कामाला जाणारे नागरिक दिवा स्टेशन ते बेडेकर नगर चालत येऊन रात्री पाण्यासाठी त्यांना जागाव लागत आहे. या बेडेकर नगरच्या बाजूलाच आगासन फाटकाजवळ दिव्याला पाणी पुरवठा करणारी सर्वात मोठी जलवाहिनी आहे. असे असताना देखिल बेडेकर नगरच्या रहिवाशांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहेत. त्या रहिवाशांनी शेवटी कंटाळून पालिका अधिकाऱ्यांनी उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT