kalyani dombivali water supply closed sakal
मुंबई

Kalyan Dombivli Water Supply : मंगळवारी कल्याण डोंबिवलीत पाणी नाही

शर्मिाला वाळुंज

डोंबिवली : मोहिली व नेतीवली जल शुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरणाच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मंगळवारी 15 ऑक्टोबरला सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत कल्याण डोंबिवली शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

कल्याण, डोंबिवली शहरांना उल्हास नदी काठच्या मोहिली, नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जातो. या दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत, यांत्रिकी उपकरणांच्या देखभाल, दुरुस्तीचे काम मंगळवारी पालिकेच्या नियंत्रणाखाली ठेकेदाराकडून केले जाणार आहे.

या दुरुस्तीच्या कालावधीत कल्याण शहरासह, कल्याण ग्रामीण भागातील मांडा, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी, कल्याण पश्चिमेतील ब प्रभागातील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला महाविद्यालय परिसर, मुरबाड रस्ता परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. डोंबिवली पूर्व, पश्चिमेचा पाणी पुरवठा या कालवधीत बंद राहणार आहे.

दुरुस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी कल्याण, कल्याण ग्रामीण, डोंबिवली शहरांना कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sayaji Shinde: अभिनेता ते नेता! सयाजी शिंदेंचा दरारा आता राजकारणातही; राष्ट्रवादीत झाला दणक्यात प्रवेश

Prathamesh Parab : लेक एवढा मोठा स्टार असून प्रथमेशचे वडील अजूनही करतात हे काम ; "घरची परिस्थिती हलाखीची तरीही..."

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणीचा अर्ज मिस झाला? हरकत नाही, मुदत आणखी वाढलीए! जाणून घ्या नवी तारीख

Santosh Juvekar: भूमिकेसाठी काय पण! संतोष जुवेकरचा ‘रानटी’ चित्रपटातील खतरनाक अंदाज; लूक व्हायरल

Paris Olympic 2024 पदक विजेत्या Manu Bhaker चा रॅम्प वॉक

SCROLL FOR NEXT