Shahapur Tahsil Waterfall sakal
मुंबई

Waterfall : धबधबे पर्यटकांना बंद असल्याने स्थानिक ग्रामस्थांचा रोजगार बुडतोय; पर्यटकांची नाराजी, धबधबे खुले करण्याची होतेय मागणी

ग्रामीण भागात असलेल्या धबधब्यावर पर्यटक वळू लागले असून सद्या स्थितीत प्रसिद्ध असलेल्या अशोका धबधब्यावर वनविभागाने गेटवर कुलूप लावून जाण्यास केली बंदी.

नरेश जाधव

ठाणे - गेल्या 4/5 वर्षांपासून पावसाचा जोर जास्त असल्याने शहापुर तालुक्यातील धबधब्याच्या पाण्यात ठिकठिकाणी अनेकांचे बळी गेल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून पावसाळ्यात शहापुर तालुक्यातील ठीकठिकाणच्या धबधब्याच्या पर्यटनस्थळावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधक उपाय म्हणून 15 जून ते 30 ऑगस्ट 2024 पर्यंत पर्यटकांना जाण्यास मज्जाव केला आहे.

शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या धबधब्यावर पर्यटक वळू लागले असून सद्या स्थितीत प्रसिद्ध असलेल्या अशोका धबधब्यावर वनविभागाने गेटवर कुलूप लावून जाण्यास बंदी केली असल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत आहेत. तर यामुळे पर्यटनस्थळाच्या ठिकाणी लहान-सहान रोजगार करून पोटाची खळगी भरणाऱ्या स्थानिक गरजू लोकांचा रोजगार बुडाल्याने त्यांच्यावर हलाखीची परिस्थिती ओढवली आहे.

ह्या धबधब्याच्या सुशोभीकरण करण्याकरिता शासनाने करोडो रुपये खर्च केले असून, हे धबधबे जर दरवर्षी पावसाळ्यात बंद असतील व उसळणाऱ्या धबधब्याचा आनंद घ्यायला मिळत नसेल तर ह्या करोडो रुपयांचा खर्चाचा उपयोग फक्त ठेकेदारासाठीच केला जातो का? असा सवाल स्थानिक रहिवाशी व पर्यटक करीत आहेत. शासनाने ह्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करून धबधबे खुले करण्यात यावेत अशी मागणी पर्यटक व स्थानिक रहिवाशी करीत आहेत.

पर्यटनास वाव मिळावा यासाठी तालुक्यात पर्यटन विकास अंतर्गत आणि काही ठिकाणी वनविभाग निधीच्या माध्यमातून धबधबे आणि धरण, तलाव, नदी क्षेत्र परिसरात कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आले आहेत. मात्र आजही शहापुर तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा, आजा पर्वत, सापगाव, डोळखांबचे डोंगर, दहिगाव, माहुली धबधबा व अशोका धबधबा याठिकाणच्या पावसाळी सहलीला सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत.

परंतु येथील धबधबे शासनाने सद्यस्थितीत बंद केल्याने पर्यटक हिरमुसले होऊन व प्रशासना विरोधात संताप व्यक्त करून मागे फिरत आहेत तर काही पर्यटक चोरीछुप्या पद्धतीने सुरक्षारक्षकाना व पोलिसांना गुंगारा देऊन धबधब्यावर ये-जा करतांना दिसत आहेत. वनविभागाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पर्यटनबंदी केली असल्याने स्थानिक रहिवाशी, बेरोजगार तरुण व पर्यटक संताप व्यक्त करीत आहेत.

तालुक्यातील पर्यटन स्थळांपैकी मुंबई, ठाणे व नाशिकरांसाठी प्रसिद्ध असलेला अशोका धबधबा पर्यटन बंदीमुळे पर्यटक हेलपाटे मारीत आहेत.ह्या ठिकाणी अनेक हिंदी चित्रपटाच्या शूटिंग झाल्याने पर्यटक येथे मोठ्या संख्येने येऊन धबधब्यात भिजण्याचा आनंद घेत असतात.

येणारे पर्यटक येथील गावठी मासे, कोबड़े, खेकडे व चिबोरीच्या झणझणीत जेवणावर ताव मारत असतात त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या भागातील आदिवासींना पर्यटनातून जेवण बनवून देण्याचा रोजगार निर्माण होत असे, परंतु तो आता पूर्णतः बंद आहे. उन्हाळ्यात येथे रोजगार उपलब्ध नसल्याने व पावसाळ्यातही येथे पर्यटन बंदी अशा बिकट परिस्थितीत आदिवासी समाज दुहेरी संकटात सापडला असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.

आता कुठे येथे पर्यटनासाठी पर्यटक येऊ लागलेत. पण धबधब्यांचे गेट बंद असल्याने पर्यटक नाराज होऊन इतरत्र रस्त्यावर मजा लुटत आहेत, इथले धबधबे सुरू असते तर पर्यटकांच्या माध्यमातूनसद्या रोज रोजगार उपलब्ध झाला असता व चार महिने का होईना रोजगाराची घडी बसली असती होती व येथीलस्थानिक बेरोजगाराना रोजगारासाठी वणवण भटकण्याची गरज नसती पण शासनाच्या दुर्लक्षामुळे येथील स्थानकावर उपासमारीची पाळी आली असल्याचे येथील देविदास कामडी यांनी सांगितले

पावसाळ्याच्या दिवसात वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी विहिगाव वासीयांच्या मेजवाणीला पसंती होती. काही पर्यटक वीकएंडच्या शनिवारी मुक्कामी यायचे.अशावेळी कुणी चुलीवरचे शाकाहारी, मांसाहारी जेवण बनवून द्यायचे.कुणी वडापाव, तर कुणी कणसे विकून रोजगार मिळवत होता. त्यामुळे किमान चार महिने तरी रोजगारासाठी बाहेर पडायची गरज नव्हती.

'शासनाने येथील पर्यटन स्थळांना कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले परंतु येथील धबधबे बंद करून ठेवल्याने पर्यटकांना आनंद घेता येत नाही मग हा खर्च कश्यासाठी? त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना रोजगारालाही मुकावे लागत आहे.'

- मंजुषा जाधव, माजी जिप अध्यक्ष, ठाणे

'अशोका धबधबा सुरू करण्यात यावा यासाठी ग्रामसभेत ठराव घेण्यात येणार असून शासनाने येथील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन येथील धबधबे लवकर सुरू करावेत. यासाठी पत्रव्यवहार करण्यात येईल.'

- मनोज दळवी, ग्रामसेवक, विहिगाव ग्राप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT