Raj Thackeray 
मुंबई

Raj Thackeray: ..तर आम्ही टोल नाके जाळू ; फडणवीसांच्या त्या दाव्यावरून ठाकरेंचा सरकारला इशारा

सकाळ डिजिटल टीम

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा टोल प्रश्न गाजवणार असल्याचे दिसत आहे. कारण जर आम्हाला अडवलं तर आम्ही टोल नाके जाळू असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

टोलचा पैसा हा कॅशमधून मिळतो. हा पैसा जातो कुठे आणि त्याच-त्याच लोकांना ठेके मिळतात कसे? टोल घेऊनही खड्डे पडतात. वरून आपण रोड टॅक्सही भरतो त्यामुळे हा सगळा पैसा जातो कुठे?

यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची ७ जुनी वक्तव्य दाखवली. यामध्ये अजित पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, आणि गोपीनाथ मुंडे यांचे व्हिडियो दाखवण्यात आले. त्या सर्वांनी आम्ही महाराष्ट्र टोलमुक्त करू असे जाहीर केले होते.

तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडिओ दाखवला. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, आम्ही केवळ मोठ्या वाहनांचा टोल घेत आहोत. इतर कोणत्याही वाहनांकडून आम्ही टोल घेत नाही. असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की आता याच्यापुढे टोल नाक्यावर माझी माणसं थांबतील तिकडं केवळ मोठ्या वाहनांवर टोल घेतला जाईल याकडे लक्ष देतील. आणि जर याला कोणी विरोध केला तर आम्ही तो टोल नाका जाळू असे राज ठाकरे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Candidates : मुंबईतील इच्छुक मराठा उमेदवारांची यादी आली समोर; मनोज जरांगे शिक्कामोर्तब करणार का?

लग्नाला 20 वर्षं उलटूनही पंकज त्रिपाठींच्या आईने सुनेला स्वीकारलं नाही ; 'हे' आहे कारण

Sports Bulletin 25th October: भारताला वाचवण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरचे प्रयत्न ते आयपीएल लिलावापूर्वी मोठ्या घडामोडींचे संकेत

Diwali Recipe : दिवाळीची स्वच्छता करताना काही रहायला नकोय, तुम्ही घरातील या ठिकाणांची स्वच्छता केली का?

Latest Maharashtra News Updates Live : कुजलेले काजू, सुकामेव्याचा वापर करून मिठाई बनवणाऱ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT