मुंबई: राज्यात एकाबाजूला मंदिर उघडण्यासाठी (opening temple) भाजपाचे शंखनाद आंदोलन (bjp protest) सुरु असताना, दुसऱ्याबाजूला दहीहंडी उत्सव (dahihandi) साजरा करण्यासाठी मनसे (Mns) आक्रमक झाली आहे. ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान मनसेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी एक आक्रमक टि्वट केलं आहे.
"हिंदू सण साजरे होणारच. यंदाची दहीहंडी दणक्यात साजरी करणार. चलो ठाणे" असा नारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आज आणि उद्या दहीहंडी उत्सवावरुन संघर्ष होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे यंदा सरसकट दहीहंडी उत्सव (dahihandi celebration) साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
मात्र तरीही दहीहंडी साजरी करण्यावर मनसे (mns) आणि भाजपा (bjp) ठाम आहे. आज ठाण्यात नौपाडा परिसरातील (thane dahihandi) भगवती शाळेच्या मैदानात दहीहंडी उत्सवावरुन पोलीस आणि मनसैनिक आमने-सामने आले होते. मनसैनिकांकडून दहीहंडीसाठी स्टेज उभारण्याचे काम सुरु असताना पोलीस तिथे येऊन पोहोचले. ठाण्यात दहीकाला उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. तिथे मोठे आयोजक आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.