मुंबई

Weather News: 'ऑक्टोबर हिट’ची झळ वाढली ;जमिनीला पडू लागल्या भेगा!

सकाळ डिजिटल टीम

Weather News: ‘ऑक्टोबर हिट’ची झळ पालघर जिल्ह्याला बसू लागली असून उष्णतेमुळे जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. बुधवारी (ता. २५) ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील आठवड्यात हे तापमान कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दुचाकी, रिक्षा वाहनांना गरम वाऱ्याची झळ सोसावी लागत आहे. शरीरातील पाणी कमी होऊ नये, म्हणून पाण्याचा वापर वाढला आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक रुमाल, हातमोजे वापरत आहेत. डॉक्टरांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आठवड्यातील तापमान (अंश सेल्सिअस)
रविवार ३६
सोमवार ३६
मंगळवार ३६
बुधवार ३४
गुरुवार ३४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shinde vs Bjp: शिंदे गटाने दिला भाजपलाच धक्का; बड्या नेत्याला बनवले शिवसैनिक

Mumbai: तो येतोय! घराणेशाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी; नवी मुंबईत लागले बॅनर, कोणाला आव्हान?

IND vs BAN, 2nd Test: मैदान खेळण्यास तयार नाही! तिसऱ्या दिवसाचा खेळही झाला रद्द; BCCI ने दिले अपडेट्स

Shivsena: ठाकरे गटाचे शिंदे गटास सहकार्य, माजी आमदाराने दाखवला मनाचा मोठेपणा, नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Live Updates: '"उच्च मतदानाचा आम्हाला फायदा होईल, लोकांना बदल हवा आहे आणि ते भाजपला कंटाळले आहेत" सचिन पायलट

SCROLL FOR NEXT