Mumbai Local ESakal
मुंबई

मुंबईत मुसळधार! लोकलसेवेवर मोठा परिणाम, ट्रेन तब्बल ३० ते ४५ मिनिटे उशीराने, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

Vrushal Karmarkar

मुंबईत पावसाने सुरुवात केली आहे. पावसाचा जोर वाढणार असून हा क्रम गुरुवारपर्यंत कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबईत उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आता याचा परिणाम लोकलसेवेवर झाला आहे. मुंबई लोकल उशीराने धावत आहे.

पाणी साचल्याने अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे BKC-चुनाभट्टी कनेक्टरवर पाणी साचल्याचे समोर आले आहे. विद्या विहार आणि मुलुंड दरम्यान, UP आणि डाउन लोकल मार्गांवर मुसळधार पाऊस आणि पाणी साचले आहे. भांडुप-नाहूर डाऊन लोकल मार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कांजूरमार्ग आणि विक्रोळी दरम्यान, अप आणि डाउन सेवांवर ३० किमी प्रतितास प्रश्न आदेश लागू करण्यात आला आहे. यामुळे लोकल उशीराने धावत आहे.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा ३० ते ४५ मिनिटे विलंबाने धावत आहे. तर हार्बर मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहे. सर्वच स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. तर मुसळधार पावसामुळे ठाणे-मुंब्रा बायपासवर दरड कोसळली आहे. दरम्यान हवामान खात्याने मुंबई यांनी आज ते उद्या सकाळ दि.२६.०९.२४ पर्यंत मुंबई, मुंबई उपनगर या ठिकाणी वादळ व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाची पध्दत सक्रिय असून उत्तर महाराष्ट्रात मान्सूनचा माघार घेणारा क्षेत्र सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. IMD नुसार मराठवाड्यात २५ आणि २६ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. तर विदर्भात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग! सर्वाधिक पावसाची नोंद, जाणून घ्या कोणत्या परिसरात किती कोसळला?

Pune Rain: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर

Rain News: धो धो पावसामुळे टॅक्सीवाले मालामाल; अतिरिक्त भाडे आकारत चाकरमान्यांची लूट, प्रवाशांमध्ये संताप

Mumbai Rain: मुंबईत परतीच्या पावसाचा कहर! डोंबिवलीत वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर मुंब्रा बायपासला दरड कोसळली

Changes in Transportation : पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त असे असतील शहरातील वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT