Mumbai Weather  ESakal
मुंबई

Mumbai Rain: मुंबईसह पुण्यात पावसाची जोरदार हजेरी, सकल भागात साचले पाणी, वाहतुकीला अडथळा

Mumbai Weather Update: मुंबईत मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचले असून त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातूनच पायपीट करावी लागत आहे.

Vrushal Karmarkar

Rain Update: मागील तीन दिवसांपासून राज्यात पाऊस पडत आहे. आता हवामान खात्याने मुंबई आणि पुण्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आज मुंबईतील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. पाणी साचल्यामुळे काही ठिकाणी वाहने देखील पाण्यात बंद पडल्याचे दिसून आले आहे. तर पुण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून मुंबईत पावसाने जोरदार बॅटींग सुरु केली आहे. मुंबईच्या मुलुंड, भांडुप, नाहूर, कांजुरमार्ग आणि विक्रोळीसह घाटकोपर भागात पाऊस सुरू झाला आहे. पावसाचा जोर कायम आहे. यामुळे भांडुपच्या सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पाणी साचल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. भांडुपच्या कोकण नगर पश्चिम येथे पावसाने वेग पकडला आहे.

तर दुसरीकडे नवी मुंबई, बदलापूर-डोंबिवली-वांगणी-कर्जत-माथेरानमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे गरज असेल तर बाहेर पडा असं आवाहन करण्यात आले आहे. तर पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईची लाईफलाईन लोकलवरही परिणाम होऊ शकतो. नवी मुंबई-पनवेलजवळ गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर डोंबिवली-कल्याणमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे घोरपडी मधील बी टी कवडे रस्ता परिसरात अग्निशमन केंद्रासमोर पाणी साचून तळे निर्माण झाले आहे. यातून वाहने चालवताना नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. बाणेर बालेवाडी परिसरात दुपारी साडेतीन पासून मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साठले आहे. पानशेत धरणातून सांडवाद्वारे 977 क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये 2568 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. ससून रुग्णालयाच्या समोर रस्त्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं असून अनेक दुचाकी चालकांना मार्ग काढताना अडचणी येत आहेत.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान खात्याने विशेषतः मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ठाणे आणि पालघरसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार तर काही जिल्ह्यांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT