मुंबई- 'फेअर अँड लव्हली' या फेअरनेस क्रीममधून आता 'फेअर' शब्द वगळण्यात आला आहे. फेअर अँड लव्हलीचं नाव आता 'ग्लो अँड लव्हली' (Glow & Lovely) असणार आहे. हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीने रिब्रँडिंग करत हा निर्णय घेतला. यापुढे FAIR & GLOW म्हणून ही स्किन क्रिम ओळखली जाईल. कंपनीनं तब्बल 45 वर्षांनी आपल्या इतक्या मोठ्या ब्रँडचं नाव बदललं. मात्र या बदलाचं खरं श्रेय जातं ते मुंबईतल्या अवघ्या 22 वर्षीय तरुणीला.
मुंबईत राहणारी 22 वर्षीय चंदना हिरान ही तरुणीनं FAIR & LOVELY तील 'फेअर' घालवण्यासाठी लढा दिला. हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीला फेअर अँड लव्हली यांना नावामुळे अनेक वर्णभेदाच्या आरोपांचा सामना करावा लागला. अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर वर्णभेदाचा वाद निर्माण झाला होता. ब्लॅक लाईव्हज् मुव्हमेंट सुरू झाली. या चळवळीने चंदना प्रेरित झाली. फेअर अँड लव्हली वरून चंदनाने HUL विरोधात change.org वर ऑनलाइन याचिका दाखल केली. या याचिकेवर केवळ दोन आठवड्यात तब्बल 15 हजारपेक्षा जास्त लोकांनी आपल्या स्वाक्षऱ्या करुन चंदनाला पाठिंबा दर्शवला.
ब्लॅक लाईव्हज् मुव्हमेंटला अनेक भारतातल्या सेलिब्रिटींनी सुद्धा पाठिंबा दर्शवला. तेव्हा भारतातील वर्णभेदाबाबतही प्रश्न उपस्थित झाले. फेअर अँड लव्हली देखील फेअरच लव्हली असते हे ते आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत होते, असं मला वाटलं आणि म्हणूनच मी हिंदुस्तान युनिलिव्हरविरोधात याचिका दाखल करत क्रिमचं हे नाव बदलण्याची मागणी केली. बीएलएम चळवळीमुळेच कंपनीला असं पाऊल उचलण्यास भाग पडलं, असल्याचं चंदना म्हणाली.
चंदना पुढे म्हणते की, बॉलिवूड असो किंवा त्यातली गाणी असो, कविता किंवा एव्हेंट आर्ट असो कृष्णवर्णीयांचा देश असूनही गौरवर्णालाच भारतात प्राधान्य दिलं गेलं. माझ्यासारखा रंग असलेल्या मुलींचं लोकप्रिय संस्कृतीत प्रतिनिधीत्व करणारं असं कुणीच नाही. माझ्यासारखा रंग असलेली मेन लीडची अभिनेत्री आजपर्यंत मला सिनेमात दिसली नाही. माझ्या रंगाचं समर्थन करणारे मॅगझीन किंवा जाहिरात मला कधीही दिसली नाही. अगदी सोशल मीडिया आणि फोटो एडिटिंग साइटसवरील फिल्टर्समध्येही तुम्ही गोरं कसं दिसाल यावरच भर दिला जातो.
मी केलेल्या याचिकेतून मला आणखी काही अपेक्षित नव्हतं. शेवटी फेअर अँड लव्हली हे कित्येक वर्षांपासून आहे. मात्र अशा ब्रँडचं नाव बदलणं हे योग्य दिशेनं टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं असं चंदना म्हणाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.