मुंबई : पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV camera) बसविण्यात येत आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आधुनिकता आणण्यासाठी रशियन कंपनीने (Russian company) तयार केलेले सीसीटीव्ही पश्चिम रेल्वेवरील (Western railway) स्थानकात बसविण्यात आले आहेत. सध्या पश्चिम रेल्वेवर 2 हजार 700 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून यामधील 450 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे हे एनटेक लॅब या रशियन कंपनीचे आहेत.
पश्चिम रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकात प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवणे अवघड आहे. त्यामुळे या नव्या रशियन बनावटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे गर्दीच्या ठिकाणी एकाच फ्रेममधील 50 प्रवाशांची एकाचवेळी ओळख पटविणे शक्य आहे. त्यामुळे या कॅमेऱ्यांतून गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि हरविलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी या कॅमेऱ्यांची मदत होत आहे. कॅमेऱ्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीचा चेहरा टिपला जाऊन त्याचा दस्तऎवज तयार होते. त्याद्वारे प्रवाशांचा शोध घेणे शक्य आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
हे सर्व कॅमेरे गर्दीच्या भागात, संवेदनशील परिसरात बसविले आहेत. हे कॅमेऱ्याद्वारे परिसरात 24 तास देखरेख ठेवली जाते. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआई) आधारित इंट्रूडर अलार्म सिस्टम इंफ्रा-रेड आधारित सीसीटीवी कैमरासह काम करतो. यामुळे 360 डिग्री कव्हरेज घेता येणे शक्य होते. एआई आधारित यूजर इंटरफेस सॉफ्टवेअरच्या मदतीने फक्त प्रवाशांना केंद्रीत केले जाते, अशी माहिती पश्चिम रेल्वेने प्रशासनाने दिली.
चालू वर्षात ऑगस्ट महिन्यांपर्यंत एकूण 1 हजार 168 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर, 2020 वर्षात एकूण 8 हजार 408, 2019 वर्षात एकूण 11 हजार 283 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे गुन्हे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांनी घटले आहे, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने 2019 वर्षात 33 गुन्ह्यांचा शोध लावून 41 जणांना पकडले. तर, 2020 वर्षात 21 गुन्ह्यांमधील 21 जणांना पकडले. तर, यावर्षी ऑगस्ट महिन्यांपर्यंत 34 गुन्ह्यांचा शोध लावला असून यातून 38 जणांना पकडले आहे.
पश्चिम रेल्वेच्या 48 लोकल आणि एक्स्प्रेसमध्ये 1 हजार 397 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यामधील 139 सीसीटीव्ही कॅमेरे महिला डब्यात तर, इतर 58 सामान्य डब्यांत लावले आहेत. उर्वरित महिला डब्यात लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. तर, आपत्तीजनक घटना किंवा इतर अत्यावश्यक परिस्थितीवेळी महिला प्रवाशांना अतिरिक्त सुविधा देण्यासाठी 27 महिला डब्यात टाॅक बॅक सिस्टम बसविली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.