मुंबई

अचानक! पश्चिम रेल्वेच्या २० निवासी इमारती धोकादायक, कर्मचारी आश्चर्यचकित

पूजा विचारे

मुंबईः पश्चिम रेल्वेनं २० निवासी इमारती धोकादायक म्हणून घोषित केल्यात. पश्चिम रेल्वेच्या म्हणण्यानुसार नुकताच VJTI (वीरमाता जिजाबाई टेक्नोलॉजिकल इन्स्टिट्यूट) यांनी सादर केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार हा निर्णय देण्यात आला आहे. दरम्यान आरएलडीए (रेल्वे जमीन विकास प्राधिकरण) मार्फत इमारत बिल्डरकडे हस्तांतरित करणं हा केवळ एक पर्याय असल्याचं कामगार युनियननं म्हटलंय. 

अंधेरी रेल्वे कॉलनीतील रहिवासी जे रेल्वेचे कर्मचारी आहेत. ज्याची इमारत धोकादायक घोषित करण्यात आली आहे.  ते म्हणाले की, माझी इमारत जुनी आहे पण मोडकळीस आलेल्या स्थितीत नाही, ती दुरुस्त केलेली आहे. पावसाळ्यात आणि कोरोना व्हायरससारख्या परिस्थितीत झालेल्या या अचानक निर्णयानं मी आश्चर्यचकित झालो. 

WRMS (पश्चिम रेल्वे मजदूर संघ) चे सरचिटणीस जे.जी. माहूरकर म्हणाले, रेल्वे भूमी विकास प्राधिकरणामार्फत बिल्डरांना रेल्वेची जमीन हस्तांतरित करण्यासाठी रेल्वे कॉलनी रिकामी करणे हे रेल्वे प्रशासनाचा डावपेच असल्याचं दिसतं. 

विलेपार्ले ते बोरिवली अशा मुख्य ठिकाणी  असलेल्या विभागातील इमारती अचानक धोकादायक बनल्या आहेत. पावसाळा आणि कोरोनासारखी परिस्थिती असताना क्वार्टर त्वरित रिकाम्या करण्याच्या सूचना रेल्वे कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचं माहूरकर यांनी म्हटलंय. 

या इमारती जमीनदोस्त केल्यानंतर कोण जमीन ताब्यात घेईल आणि काय विल्हेवाट लावणार आहे हे अद्याप समजलेलं नाही. हे सर्वकाही गोंधळात टाकणारं असल्याचंही ते म्हणालेत. 20 जुलैला पाठवलेल्या एका पत्रात  WRMSच्या महाव्यवस्थापकांना हस्तक्षेप करून रेल्वे कर्मचार्‍यांना या समस्येपासून वाचविण्याची विनंती करण्यात आली. 

पावसाळ्याच्या दिवसात आणि कोविड १९ सारखी परिस्थिती असताना या इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटूंबियांसमोर घरं रिकामी कसं करावं ही एक मोठी समस्या उभी राहिली आहे. या अचानक झालेल्या निर्णयामुळे आणि कोरोनाच्या संकटकाळात सुमारे ४०० रेल्वे कुटुंबं बेघर झाली आहेत, असं आणखी एका रेल्वे कर्मचाऱ्यानं म्हटलं आहे. ज्याची इमारतही धोकादायक म्हणून घोषित करण्यात आलीय. 

पश्चिम रेल्वेनं हे आरोप फेटाळत म्हटलं की, हा आरोप निराधार आणि खोटा आहे. व्हीजेटीआयने सादर केलेल्या लेखापरीक्षण अहवालानुसार २० निवासी आणि एक रेल्वेच्या कार्यालयाची इमारत मानवी वस्तीसाठी असुरक्षित घोषित करण्यात आली आहेत, पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर म्हणाले. या इमारतींमध्ये राहणाऱ्यांसाठी पर्यायी राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधित विभागाला यापूर्वीच देण्यात आल्या असल्याचं, ठाकूर यांनी सांगितलं आहे. 

Western Railway declared one service and twenty residential buildings dangerous

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT