मुंबई : विमानाप्रमाणे पश्चिम रेल्वेवरील (western railway) प्रवाशांना प्रवासात अधिक सुविधा (more facilities) देण्याच्या उद्देशाने 18 मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘शॉपिंग ऑन व्हील' ही नवीन (shopping on wheel) सुविधा सुरू करण्याचा निर्णय ऑगस्ट 2019 मध्ये घेतला होता. त्यानुसार सहा एक्स्प्रेसमध्ये (express) ही सुविधा सुरू केली होती. मात्र, या सुविधेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. त्यानंतर कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे (corona lockdown) एक्स्प्रेसमध्ये हा उपक्रम राबविणे बंद केले आहे. त्यामुळे कोट्यवधीचे कंत्राट देऊन सुरू केलेला उपक्रम ठप्प करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी होण्यासाठी सहा मेल, एक्स्प्रेसमध्ये ‘शॉपिंग ऑन व्हील' उपक्रम सुरू केला. यामध्ये वांद्रे टर्मिनस-अमृतसर पश्चिम एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर अंत्योद्य एक्स्प्रेस, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस मुंबई सेंट्रल-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस - जम्मू विवेक एक्स्प्रेस आणि अहमदाबाद-मुंबई सेंट्रल डबल डेकर एक्प्रेसमध्ये 'शॉपिंग ऑन व्हील'संकल्पनेची सुरूवात केली. यासह आणखी 12 मेल, एक्प्रेसमध्ये ही सुविधा लागू केली जाणार होती. या सर्व उपक्रमासाठी एका खासगी कंपनीला पाच वर्षांचे 3.66 कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते.
मात्र, या उपक्रमाला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कोरोनामुळे मार्च 2020 पासून लाॅकडाऊन लागले. भारतीय रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प झाली. परंतु, हळूहळू प्रवासी वाहतूक सेवा झाली. तरी, 'शॉपिंग ऑन व्हील' उपक्रम सुरू झाला नाही. कोरोनामुळे भारतीय रेल्वे सेवा बंद झाली होती. त्यामुळे 'शॉपिंग ऑन व्हील' उपक्रम याबरोबर बंद झाला. आताही हा उपक्रम बंदच आहे. हा उपक्रम केव्हा सुरू करायचा, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.
एक्स्प्रेसमधील प्रवाशांना 'शॉपिंग ऑन व्हील'द्वारे महिलांसाठी मेकअप किट, लहान मुलांची खेळण्याचे साहित्य, स्टेशनरीचे साहित्य विकत दिले जात होते. मेल, एक्स्प्रेस तीन बाय तीन फुटांपर्यंतच्या शॉपिंग ट्रॉलीसह दोन कर्मचाऱ्यांद्वारे विक्री केली जात होती. या कर्मचाऱ्यांना विशेष ड्रेस कोड दिला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.