school girl beaten pocso act Sakal
मुंबई

POCSO Act: झोपेत बिछाना ओला केला म्हणून पोटच्या पोरीच्या गुप्तांगाला दिले चटके! आईवर गुन्हा दाखल

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : झोपेत बिछाना ओला केला म्हणून पोटच्या पोरीच्या गुप्तांगावर चटके दिल्याचा अतिशय अमानुष प्रकार समोर आला आहे. खुद्द चिमुकलीच्या आईनंच आपल्या लेकराला अशी शिक्षा दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल झाली असून संबंधीत आईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साम टीव्हीला मिळालेल्या वृत्तानुसार, मुंबई उपनगरातील गोवंडी भागात ही घटना घडली आहे. यामध्ये ९ वर्षाच्या मुलीनं झोपेतच बिछान्यात लघवी केली. त्यामुळं अतिशय संतापलेल्या तिच्या आईनं आपल्या मुलीला असं पुन्हा करु नये म्हणून धडा शिकवण्यासाठी पाशवी कृत्य केलं. यासाठी या आईनं स्वयंपाक घरात वापरण्यात येणारी पळी गॅसवर गरम करुन तिनं आपल्या लेकीच्या गुप्तांगावर, मांडीवर तसंच पाठीवर चटके दिले.

ज्यावेळी अशा प्रकारची अमानुष शिक्षा या आईनं आपल्या मुलीला दिली तेव्हा या मुलीचे वडील कामावर गेले होते. मुलीच्या बापाला सुरुवातीला या प्रकाराची कल्पना नव्हती. पण जेव्हा घऱी आल्यानंतर पीडित चिमुकलीच्या वडिलांच्या कानावर हा धक्कादायक प्रकार आला तेव्हा याचा खुलासा झाला.

दरम्यान, शिवाजी नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ११८ (१), ११५ (२) तसेच अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कलम ७५ अंतर्गत संबंधित आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT