dharavi corona 
मुंबई

INSIDE STORY: धारावीची रुग्णसंख्या कमी होण्यामागे काय आहेत कारणं? वाचा काय सांगतायत ऑन फिल्ड डाॅक्टर..

भाग्यश्री भुवड

मुंबई: मुंबईत सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत असताना धारावीत कोरोना रुग्णांची संख्या अतिशय कमी झाल्याची बातमी बुधवारी आली. बुधवारी धारावीत फक्त एकच कोरोना रुग्ण आढळून आला. मात्र, मोठ्या संख्येने रुग्ण आढळलेल्या धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या कमी कशी काय झाली असा प्रश्न आता विचारला जात आहे. मात्र, धारावीच्या रुग्ण संख्येविषयी, उपचारांविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत गेले चार महिने एक सुट्टी न घेता अहोरात्र कोरोना रुग्णांसाठी सेवा देणाऱ्या ऑन फिल्ड डाॅक्टरांनी या सर्व प्रश्नांचे खंडण केले आहे. 

धारावीतील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून विशेषत: सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी तेथे अनेक योजना राबवल्या. घरोघरी जाऊन तापाचे रुग्ण शोधणे, त्यांना क्वारंटाईन करणे, रुग्णांचे कोरोना स्वॅब टेस्ट करणे, असे उपाय हाती घेण्यात आले. त्यामुळे धारावीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळू लागले होते. शिवाय, धारावीत कडक लॉकडाऊनही करण्यात आला होता. मात्र, मागील एक आठवड्यापासून धारावीतील रुग्णांची संख्या कमी झाली हे तिथे 24 तास घेतलेल्या मेहनतीचे यश असल्याची प्रतिक्रिया भारतीय वैद्यकीय परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डाॅ.अनिल पाचणेकर यांनी दिली आहे. 

पहिल्या स्टेजमध्ये 20 टक्के रुग्ण शोधले - 

पहिल्या दिवसापासून घरोघरी जाऊन लोकांचे स्क्रिनींग केले गेले. स्थानिक पातळीवरील डाॅक्टरांच्या टीमला सक्रिय करण्यात आले होते. पहिल्या स्टेजमध्ये सर्वाधिक पाच हॉटस्पॉट जिथे रुग्ण जास्त सापडण्याची शक्यता होती तिथे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन 20 टक्के म्हणजेच 50 हजारांपेक्षा जास्त रुग्ण शोधले आणि त्यांना आयसोलेशनसाठी पाठवले गेले. 

धारावीत पहिला रुग्ण 1 एप्रिल या दिवशी सापडला. त्यानंतर, स्थानिक संस्था माहीम धारावी मेडिकल प्रॅक्टीशनर असोसिएशन, आयएमए आणि महापालिकेची टीम मिळून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले गेले. रुग्णांनी ही खूप सपोर्ट करुन माहिती न लपवता सर्व माहिती दिली. जे इतर लोकांच्या संपर्कात येऊन कोरोना पॉझिटिव्ह आले अशा 4 हजार लोकांना क्वारंटाईन केले गेले. 

दवाखाने उघडल्यानंतर रुग्ण शोधण्यास आणखी मदत - 

दुसऱ्या टप्प्यात धारावीतील सर्व दवाखाने उघडले. त्यामुळे, ज्यांना साधी लक्षणे वाटत होती ते रुग्ण दवाखान्यात येऊन उपचार घेऊ लागले. तिथे ही जे पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले होते त्यांना ही पालिकेच्या रुग्णालयात पाठवून दिले जात होते. त्यांच्या कुटुंबाला क्वारंटाईन केले गेले. जे रुग्ण ऐकत नव्हते त्यांना पोलिस आणि पालिकेच्या डाॅक्टरांच्या मदतीने आयसोलेशन पाठवण्यात आलं म्हणजे त्यांच्यापासून त्यांच्या कुटुंबियांना संसर्ग टाळणे सोपे झाले. 

जनजागृतीवर सर्वाधिक भर - 

मास्क, सॅनिटायझर, सोशल डीस्टस्टींगवर भर देत या विषाणूबाबत माहिती दिली गेली. काळजी कशी घेतली पाहिजे या सर्व महत्वाच्या बाबींवर लक्ष दिले गेले. धारावीत 10 बाय 10 च्या खोलीत लोक राहतात. शिवाय, सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात. त्यामुळे, पालिकेला सांगून साबण, सॅनिटायझर, पाण्याची व्यवस्था केली गेली. ज्यामुळे, स्वच्छता पाळणे सोपे झाले. 

सर्व उपचार आणि सुविधा सुरू - 

आतापर्यंत धारावीत सर्व प्रकारची व्यवस्था सुरू आहे. स्वाब चाचणी, क्वारंटाईन सेंटर्स ही सुरू आहेत. सरकार आता नवीन नियमावली काढली आहे त्यानुसार, ज्या रुग्णांना या आजाराबाबत शंका किंवा चाचण्या करायच्या असल्यास ते स्वतः ही पालिकेच्या रुग्णालयांमध्ये जाऊन ते करून घेऊ शकतात. खरंतर, गेल्या एका महिन्यापासून धारावीतील रुग्णसंख्या कमी झाली होती.

पुन्हा विस्फोट होऊ शकतो - 

आता पावसाळा सुरू झाला आहे.त्यामुळे, पावसाळी आजार वाढण्याची शक्यता आहे. जर पालिकेने याबाबतची काळजी योग्य पद्धतीने घेतली तर ही संख्या मोजता येऊ शकते. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली नसेल त्यांना हा आजार पटकन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जुलै अखेरपर्यंत ही संख्या कमी होऊन नियंत्रण मिळवणं शक्य होईल असं ही डाॅ. पाचणेकर यांनी सांगितले आहे.

(संपादन: अथर्व महांकाळ)

What are reasons behind decreased patients in dharavi read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT