मुंबई

'कोरोना'बाधिताना किती फायद्याची आहे 'हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन'ची गोळी ? डॉक्टर म्हणतायत... 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात सापडलं आहे. त्यात अजूनही कुठल्याही प्रकारचं औषध तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आलं नाहीये. मात्र हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन नावाचं मलेरियाच्या उपचारासाठी कामात येणारं औषध सध्या कोरोनाच्या रुग्णांना दिलं जातंय. मात्र हे औषध घेणं किती फायद्याचं आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन किती कामाचं ?

हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन हे औषध कोरोनाच्या उपचारासाठी किती सक्षम आहे याबद्दलची कोणतीही माहिती अजून कळू शकली नाहीये. मात्र चीन आणि अमेरिकेत कोरोनाग्रस्तांवर या औषधाचा वापर करण्यात आला. त्यात हे औषध दिल्यामुळे रुग्णच्या शरीरातला व्हायरसचं प्रमाण कमी होतं. मात्र कोरोना यामुळे संपूर्णपणे बरा होत नाही असं एम्सच्या काही डॉक्टरांचं म्हणणं आहे.

कोणत्या रुग्णांसाठी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन आहे फायदेशीर ?
 
हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर करण्याबाबत अनेक डॉक्टरांमध्ये संभ्रम आहे, मात्र अनेक दिवसांपासून काही देशांमध्ये हे औषध रुग्णांना दिलं जातंय आणि यामुळे त्यांच्या प्रकृतीत  काहीशी सुधारणा होत आहे. मात्र जे रुग्ण रुग्णालयात भरती आहेत आणि डॉक्टरांच्या निगराणी खाली आहेत त्यांनाच हे औषध दिलं जात आहे. तसंच हे औषध कोरोना वार्डात असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलं जात आहे.

स्वतःहून घेऊ नका हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन :
 
जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप असे काही लक्षणं असतील तर स्वतःहून हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेऊ नका. जसे औषधाचे चांगले परीणाम होतात तसेच या औषधाचे काही साईड इफेक्टसही आहेत. विनाकारण ही गोळी घेतल्यामुळे तुम्हाला त्वचेसंबंधीच्या काही समस्या जाणवू शकतात. तसंच तुमच्या हृदयाची गती कमी-जास्त होऊ शकते. त्यामुळे डॉक्टर हे औषध स्वतःहून न घेण्याचा सल्ला देतात.

सध्या भारतात हे औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जगभरातून भारताकडे या औषधाची मागणी होत आहे. भारत संपूर्ण जगाला हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा करणार आहे.

what doctors have to say about hydroxychloroquine tablets and its actual effect on human body

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

Rahul Gandhi : शेतकरी हितासाठी ‘मविआ’ कटिबद्ध...राहुल गांधी : सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

The Sabarmati Report : 12th Fail फेम विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'ची जादू पडली फिकी ; पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT