मुंबई

अमोल किर्तीकर यांच्या ईडी चौकशीत नेमकं काय काय घडलं? कोण कोणते मुद्दे आले समोर? घ्या जाणून

ठाकरे गटाने अमोल किर्तीकर याना मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून घोषित केले |Thackeray group announced Amol Kirtikar as candidate for Lok Sabha election from Mumbai North-West constituency

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: खिचडी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ईडीने शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकर यांची सोमवारी चौकशी करण्यात आली. खिचडी घोटाळ्या प्रकरणी अमोल किर्तीकराना ईडीने दोन वेळा समन्स पाठवले होते.(Amol Kirtikar was questioned on Monday by ED)

अमोल कीर्तिकर यांनी बुधवारी खिचडी घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीकडे आणखी वेळेची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी अमोल किर्तीकर ईडी कार्यालयात पोहोचले(Amol Kirtikar reached the ED office)

. ठाकरे गटाने अमोल किर्तीकर याना मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून घोषित केले.त्याच दिवशी खिचडी घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी ईडीने त्यांना समन्स पाठविले होते.

अमोल कीर्तिकर यांचे वकील दिलीप साटले यांनी गुरुवारी 29 मार्चला कीर्तीकर यांच्या वतीने ईडीकडे अर्ज सादर केला. या अर्जात कीर्तीकर यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी आणखी वेळ देण्याची विनंती करण्यात आली.

याप्रकरणी ईडीसोबत यापूर्वी मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनेही त्यांची चौकशी केली होती.खिचडी गैरव्यवहारप्रकरणी 1 सप्टेंबर 2023 ला फसवणूक, फौजदारी विश्वासघात, कट रचणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी 6.37 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून याच गुन्ह्याच्या आधारावर ईडी याप्रकरणी तपास करत आहे.

कोरोना काळात काही नेत्यांनी स्थलांतरित मजुरांना खिचडी पॅकेट पुरवण्याचे कोट्यवधींचे कंत्राट मुंबई महापालिकेकडून मिळवले. लॉकडाऊन काळात मुंबईतील स्थलांतरित मजुरांना 25 खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते. यात 160 कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

खिचडी पॅकेट पुरवण्याच्या निमित्ताने ठाकरे गटाच्या काही नेत्यांनी महापालिकेकडून 8.10 कोटी रुपये मिळवल्याचा आरोप आहे. त्यातील 4 कोटी बोगस कंपन्यांना वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच नेत्यांनी बोगस कंपन्या आणि नेत्यांच्या नावावर हा कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे .यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या घोटाळ्याची माहिती उघड केली होती.(It is alleged that some leaders of the Thackeray group received Rs 8.10 crores from the Municipal Corporation on the occasion of providing khichdi packets.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT