What happened riverbed near Khoni Dead fish riverbed dombivali mumbai sakal
मुंबई

Mumbai : खोणी जवळील नदीपात्रात असे काय घडले ? नदी पात्रावर मृत माशांचा खच...

ठाणे जिल्ह्यातील नद्या या प्रदुषित होत असून जलपर्णींचा देखील त्यांना विळखा पडत आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यातील नद्या या प्रदुषित होत असून जलपर्णींचा देखील त्यांना विळखा पडत आहे. यामुळे नदीतील जलचरांना धोका निर्माण झाला आहे. मलंगगड नदीचे पात्र देखील याला अपवाद नसून या पात्रातील खोणी गावाजवळ शेकडो मासे मृत पावल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.

काही ग्रामस्थांनी नदीच्या पाण्यावर मृत माशांचा खच पाहीला असता हे लक्षात आले. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. पाण्यावर पसलेल्या जलपर्णीमुळे जलचरांना ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सह्याद्री पर्वतरांगा मध्ये उगम पावणारी मलंगगड नदी ही अनेक गावांतून वाहात येऊन पुढे देसाई खाडीला मिळते. अनेक ठिकाणी नदीच्या पात्रात जलपर्णी विस्तारत असल्याचे पहायला मिळत आहे. वाढत्या जलपर्णीमुळे बारमाही वाहणाऱ्या या नदीतील पाण्याचा शेतकऱ्यांना पुरेसा फायदा होत नाही.

जलपर्णीमुळे नदीतील जलचरांना देखील धोका निर्माण झाला आहे. खोणी गावाजवळील नदीपात्रातील मासे मृत पावले असून शेकडो माशांचा खच हा पात्रावर तरंगत आहे. तसेच त्याला दुर्गंधी सुटण्यास सुरुवात झाली आहे.

शुक्रवारी सकाळी काही ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. नदीपात्र जलपर्णीने वेढलेले असल्याने त्याकडे ग्रामस्थांचे लक्ष जात नाही. परंतू जलचर मेल्यामुळे आता याकडे गांर्भियाने लक्ष देण्याची वेळ आली आहे.

देसाई खाडीला जलपर्णीचा विळखा बसला असून त्यासंबंधी कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अशोक शिनगारे यांना पत्रव्यवहार करत जलपर्णी कायमची काढण्याविषयी मागणी केली आहे.

मात्र जिल्हाप्रशासन याकडे गांर्भियाने पहात नसल्याने जलपर्णी आपले पात्र विस्तारत आहे. देसाई खाडीला मिळणारी मातली नदी देखील जलपर्णीच्या विळख्यात आली आहे. आता मलंगगड नदीचे खोणी गावाजवळील पात्र देखील जलपर्णी ने व्यापलेले दिसून येत आहे.

खोणी गावाजवळील नदीपात्रात मृत माशांचा खच पडला असून त्याला दुर्गंधी सुटण्यास सुरुवात झाली आहे. ही परिस्थिती आणखी पुढे वाढण्याआधीच प्रशासनाने त्यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. माशांचा खच हटविणे त्याबरोबरच जलपर्णी देखील काढण्यात यावी अन्यथा पावसाळ्यात गंभीर परिस्थिती गावागावांत उद्भवण्याची शक्यता ग्रामस्थ वर्तवित आहेत.

या माशांचा मृत्यु नेमका कशाने झाला ही माहिती लवकरच समोर येईल. परंतू नदीपात्रातील जलपर्णी पाण्यातील जलचरांना ऑक्सिजनची पातळी कमी पडल्याने त्यांचा मृत्यु झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. यावरुन आता तरी जिल्हा प्रशासन जागे होऊन याकडे गांर्भियाने लक्ष देणार का हे पहावे लागेल.

खोणी गावाजवळील नदी पात्रात मृत मासे आढळून आले आहेत. या माशांचा मृत्यु जलपर्णीमुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. वाढलेल्या जलपर्णीमुळे पाण्यातील ऑक्सिजन पातळी कमी होऊन अशी घटना घडू शकते. पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून ते प्रयोग शाळेत पाठविण्यात येतील. त्याचा अहवाल आल्यानंतर यामागचे नेमके कारण स्पष्ट होईल.

- उपेंद्र कुलकर्णी, उप प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ

नदी पात्रातील वाढत्या जलपर्णीविषयी ग्रामसभा आणि ग्रामपंचायत बैठकांमध्ये विषय घेतले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे, परंतू ते दिले जात नाही.

- महेश ठोंबरे, ग्रामस्थ, खोणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT