मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येची माहिती समोर आली आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. मुंबई पोलिसांनी प्रकरण अत्यंत गंभीरपणे घेत ताबडतोब कारवाई करत जबाब नोंदणीचं काम सुरु केलं. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आतापर्यंत अनेक हाय प्रोफाइल व्यक्तींचे जबाब नोंदवले गेले आलेत. अगदी सुशांच्या ड्रायव्हर आणि कुकपासून ते पासून ते संजय लीला भन्साळी यांच्यापर्यन्त एकूण ४० लोकांचा आत्तापर्यन्त जबाब नोंदवला गेलाय. दरम्यान, आता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर येतेय. ही माहिती आहे सुशांत ने आत्महत्येच्या दिवशी म्हणजे १४ जून या तारखेला इंटरनेटवर काय सर्च केलंय याबद्दल.
मोठी बातमी - सुशांत सिंह प्रकरण: बिहारमधून आलेल्या अधिकाऱ्यांबद्दल महापालिकेने दिली अत्यंत महत्त्वाची माहिती, म्हणालेत...
सुशांत सिंह प्रकरणात आता आणखी एक मोठी आणि माहिती समोर येतेय. सुशांत सिंह राजपूत आपल्या आत्महत्येपूर्वी एका विशिष्ट प्रकारचा सर्च इंटरनेटवर करत होता. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत बड्या पोलिस अधिकाऱ्याने म्हटलंय की, सुशांत सिंह राजपूत आपल्या आत्महत्येपूर्वी इंटरनेटवर सतत तीन गोष्टी सर्च करत होता.
कोणत्या आहेत 'त्या' तीन गोष्टी
सुशांत स्वतःच्या आजाराबद्दल कायम शोधात, स्वतःच्या नावाने इंटरनेटवर काय माहिती छापण्यात आलीये, कुठे काय लिहिलंय हेही सुशांत शोधत होता आणि सोबतच सुशांत आपल्या आत्महत्येच्या आधी त्याची मॅनेजर दिशा सालियनचं नाव देखील शोधात होता. दरम्यान बड्या पोलिस अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार ही माहिती सुशांतच्या फॉरेन्सिक रिपोर्टमधूनही समोर आली आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या अकाउंटमधून काढण्यात आलेले पैसे हे दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झाले आहेत अशीही माहिती सामोर येतेय. सुशांतच्या बँकेच्या खात्यातून मागच्या वर्षात सर्वात जास्त म्हणजे अडीच कोटी रुपये ट्रान्स्फर केली गेलीये अशीही माहिती समोर येतेय.
what sushant singh rajput was searching before taking extreme step about his life
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.