मुंबई : गुजरातचे माजी मुख्यंमत्री आणि काँग्रेस नेते जे पंतप्रधान मोदींचे कट्टर विरोधक असलेले शंकरसिंह वाघेला यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाघेलांसोबतच्या भेटीबाबत माहिती दिली. (What was discussed in Shankarsinh Waghela Uddhav Thackeray meeting Thackeray gave an info)
ठाकरे म्हणाले, चर्चा काही झाली नाही, पण जुनी आठवण सांगतो जेव्हा ते भाजपत होते. त्यावेळी भाजपचं आणि त्यांचं बिनसलं. त्यावेळी वृत्तवाहिन्यांनी बातम्या लावल्या होत्या की, शंकरसिंह वाघेला निघाले आणि मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंची भेट घेणार. पण त्यादिवशी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन अचानक मातोश्रीवर आले होते. (Latest Marathi News)
त्यावेळी बाळासाहेबांनी महाजन यांना विचारलं की अचानक कसे आलात? त्यावर वाघेला गुजरातहून निघाले आहेत आणि मातोश्रीवर येत आहेत. तर तुम्ही त्यांची भेट घेऊ नका. त्यावर बाळासाहेब ठाकरे त्यांना म्हणाले की, सेना आणि भाजपची युती आहे काय करायचं, काय नाही हे मला कळतंय. तू काळजी करु नकोस आणि तू मला सांगायची गरज नाही. एवढे बाळासाहेब आणि शिवसेना भाजपशी प्रामाणिक होती. (Marathi Tajya Batmya)
यावरुन मला एकच सांगायचं आहे की कलंक हा शब्द जर त्यांना इतका झोंबला असेल तर त्यांनी जे काही महाराष्ट्रात चालवलं आहे तो ही राज्याला कलंकच आहे, ते त्यांनी थांबवलं पाहिजे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी वाघेलांचा संदर्भ देत भाजपवर टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.