मुंबई

INSIDE STORY : कोरोनाबाबतच्या आतापर्यंतच्या ज्ञात आणि अज्ञात गोष्टी; 6 महिन्यानंतर आपण काय शिकलो, काय नाही...

सकाळवृत्तसेवा

मुंबई: कोरोना संसर्गाला 6 महिने पुर्ण झाले आहेत. वुहानपासून सुरु झालेली कोरोनाची साथ संपुर्ण जगात पोहोचली आहे. अजूनपर्यंत या संसर्गावर प्रभावी लस आलेली नाही. सुरुवातीला आजाराची लक्षणे समजायला देखील वेळ लागला.मात्र हळूहळू डॉक्टरांना कोरोना रुग्णासंदर्भात अनेक गोष्टी समजल्या.मात्र अजूनही या आजाराबद्दल अनेक गोष्टी उमगलेल्या नाहीत. त्यामुळे आजही कोरोना रुग्णांवर निश्चित काय उपचार करावे हे कळत नाही.

आतापर्यत वैद्यकीय शास्त्राला काय उमगले ?

  • कोरोना रुग्णांच्या रक्तात गुठळ्या होतात. (ब्लड क्लॉट )त्यामुळे रक्त पातळ करणारे औषध परिणामकारक आहे.
  • रुग्णांना पोटावर झोपवल्याने लंग्सवरील प्रेशर कमी करता येऊ शकते. त्यामुळे वेंटिलेटर्सचा पर्याय टाळणे शक्य आहे.
  • कोरोना विषाणू श्वसन यंत्रणा आणि फुफ्फुसा व्यतिरीक्त हृदय, यकृत, मूत्रपुंड आणि मेंदू या अवयांवरही आघात करतात.
  • रेमडेसिवर, डेक्सामीथासोन हे आतापर्यंतचे परिणामकारक औषध आहेत. प्लाझ्मा थेरेपी उपायकारक ठरत आहे.
  • अधिकाधिक चाचण्या आणि जलद निकाल यामुळे रुग्णालयावरचा वाढता ताण कमी होऊ शकतो.
  • कोरोना उपचारासंबधीची माहिती जगभरातील वैद्यकीय यंत्रणांनी एकमेकांशी देणे महत्वाचे आहे. 
  • कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे 'मास्क' आणि 'सोशल डिस्टसिंग'चे पालन केल्यास डॉक्टरांवरचे दडपण कमी होऊ शकते.

वैद्यकीय शास्त्राला काय उमगले नाही ?

  • कोरोना आजारावरील प्रभावी औषध
  • कुठल्या प्रकारच्या रुग्णांसाठी कोणती उपचार पध्दती काम करेल ?
  • रेमीडेसिवरसारख्या प्रभावी औषधांचा पुरवठा सर्व रुग्णालयात होईल का ?
  • कोरोना रुग्ण बरा होण्यासाठी निश्तित किती वेळ लागतो ?
  • कोरोना संसर्गाचा आरोग्यावर दिर्घकालीन काय परिणाम होणार ?

जगभरातील अनेक देशांत सहा महिन्यांनंतर ही कोरोना संसर्गाचा थैमान सुरूच आहे. जगभरात बाधित रुग्णांचा आकडा 1,03,57,662 वर पोचला आहे तर 5,08,055 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर 4.91 इतका आहे. तर देशातील रुग्णांची संख्या  6,04,641 वर पोचली असून 17,834 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्युदर  2 .95 इतका आहे. महाराष्ट्रातील रुग्णासंख्येने 1,80,298 चा आकडा पार केला असून 8,053 मृत्यूची नोंद झाली आहे. तर मृत्युदर 4.47 वर पोचला आहे.

what we know about corona and what we learnt after six months of corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT