मुंबई

31 मे नंतर लॉकडाऊन 5.0, की उठणार राज्यातला लॉकडाऊन? वाचा पुढे काय...

सकाळवृत्तसेवा

मुंबई- सध्या महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. त्यातच लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपायला शेवटचे चार दिवस राहिले आहेत. त्यातच आताच समोर आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सरसकट लॉकडाऊन उठवण्यावर ठाप नसल्याचं समजतंय. एकीकडे राज्याकडे कोरोनाचा संकट असताना दुसरीकडे राज्यातल्या राजकारणात अनेक खलबतं सुरु आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मातोश्रीवर भेट झाली. या भेटीनंतर राज्यातल्या राजकारणाविषयी उलट सुलट चर्चा सुरु झाला. मात्र या बैठकीत येत्या काळातील लॉकडाऊन संबंधी सविस्तर चर्चा झाल्याचं समजतंय. मुंबई पुण्यात कोरोनाचा प्रार्दुभाव सर्वाधिक आहे. त्यातच या भागातील आणि इतर शहरात कशापद्धतीनं लॉकडाऊन उठवता येईल यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. तसंच राज्याला कोरोनानं विळखा घातला असला तरी येत्या काळात जनजीवन रुळावर आणणं हाच पर्याय असल्याचंही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं. 

देशभरात गेल्या दोन महिन्यांपासून जास्त काळ लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या काळातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पाही सुरु असून या टप्प्यातील शेवटचे चार दिवस बाकी आहेत. लॉकडाऊनच्या चारही टप्पात कोरोना, लॉकडाऊन, रेडझोन, नॉन रेडझोना, ऑरेन्ज झोन, ग्रीन झोन यात टप्प्यानुसार राज्य प्रशासनाकडून बदल केले गेले. 

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीच्या मुद्दयावरुन चर्चा झाल्याचं बोललं जातं होत. मात्र या बैठकीत प्रत्यक्षात जनजीवन सुरळीत करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. 

लॉकडाऊन आणखी वाढवणार? 

राज्यात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचा, छोट्या व्यापाऱ्यांचा तसेच नोकरदारांचा धीर सुटलेला पाहायला मिळाला. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा काही केल्या कमी होत नाही आहे.  दैनंदिन व्यवहार सुरु केले तर राज्यातल्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी काही दिवस लॉकडाऊन कायम ठेवणं शक्य आहे का, असा विचार सध्या मुख्यमंत्री करत आहेत. 

पावसाळा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावरही चर्चा 

पावसाळा आता तोंडावर आला आहे. त्यातच जुनपासून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षही सुरु होईल. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला सोडला तर अन्य सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे राज्याची आर्थिक घडीही विस्कटली आहे. त्यातच लाखोच्या संख्येनं मजुर वर्ग आपआपल्या गावी परतले आहेत. तसंच काही कामगार आपल्या गावी जाण्याऐवजी मुंबईत आज ना उद्या व्यवहार सुरु होतील, या आशेवर मुंबईतच राहिलेत. या सर्व गोष्टींवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. 

लॉकडाऊन 5.0 होणार? 

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही कोरोना आटोक्यात येत नाही आहे. त्यामुळे 31 मे रोजी लॉकडाऊन उठवण्याऐवजी हळूहळू शिथिल करण्याच्या मुद्द्यावर उद्व ठाकरेंनी भर दिला. मुख्यमंत्र्यांच्या या मुद्द्याला पवार यांनी दुजोरा दिला. 

मुंबईत सार्वजनिक वाहतूक सुरु करणं अयोग्यचं असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मताशी पवार यांनी सहमती दर्शवली. तसंच इतर उद्योगधंदे मात्र तातडीनं सुरू व्हायला पाहिजेत, असं मतही पवारांनी व्यक्त केलं.

what will happen in maharashtra after 31st may lockdown will be lifted or lockdown 5 is the question

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT