मुंबई

जाणून घ्या आडनावांतील गंमतीजमती...

सुस्मिता वडतिले

मुंबई - लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना स्वतःचं नाव आवडतं, त्यात काही प्रश्नच नाही. त्यात आडनाव हे प्रत्येकांची आयडेंटिटी असते. आडनाव कसेही असले तरी प्रत्येकाला आपल्या आडनावाचा अभिमान कायमच असतो. आपल्या नावाप्रमाणेच आपले आडनाव ही आपली आणि आपल्या कुटुंबाची ओळख असते. काही आडनाव विनोदी, गंमतीशीर असतात तरीही प्रत्येकांना आपल्या नावाचे कौतुक असतेच. असो तर या आडनावांचा विचार करताना मनात अनेक प्रश्न उभे राहतात. ही आडनावे कोठून आली आणि नक्की कधी आणि कशी आली? असे एक ना अनेक प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात.

मराठी आडनाव हा संपूर्ण भारतात उत्सुकतेचा विषय बनलेला आहे. आपण शाळा, महाविद्यालय, ऑफिस आणि एखाद्या कार्यक्रमास अशा कोणत्याही ठिकाणी पहिल्यांदा गेलो तर त्यावेळी अनेकांसोबत आपली नव्याने ओळख करून दिली जाते तर आपली स्वतःची ओळख आपण स्वत: करून देतो. त्यावेळी आपण आपले नाव आणि आडनाव सांगतो. प्रत्येकांना अनेक नावे ही आधीपासूनच माहिती असतात. त्यामुळे नाव लगेच लक्षात राहते. परंतु पहिल्या भेटीत एखादे आडनाव ऐकले तर लगेच समजत नाही, त्यावेळेस 'आपलं आडनाव काय म्हणालात...?' साहजिकच असा प्रश्न सर्वजण करत असतीलच ना.‌.. यात काही शंका नाही. 

नावात बरचं काही असलं तरी आडनावातही भरपूर काही लपलेलं असतं. साधारणतः केवळ आडनावावरून बर्‍याचदा माणसांचा धर्म,  त्यांची संपर्काची भाषा, त्यांच्यावरील संस्कार, त्यांचा व्यवसाय, त्यांचे मुळ वास्तव्याचे ठिकाण आणि त्या अनुशंगाने त्यांचा आहार, कपडे आदी क्वचित प्रसंगी त्याचा आर्थिक दर्जा असे बरंच काही आपल्याला ओळखता येते. 

कुटुंब नाव किंवा आडनाव हे कुटुंब, घराणे, अथवा मूळ गांव यांच्यावरुन ठेवले जातात. जेथे आडनाव वापरत नाही, अशा ठिकाणी आजही नावाच्या समोर वडिलांचे नावच लावले जाते. सगळीकडे आपण पाहतो की नावा बरोबर आडनावे असतात. वडिलोपार्जित ईस्टेट मिळो अथवा न मिळो, पण आडनावाचा वारसा मात्र, अगदी नको असला तरी मिळतो. आडनाव कसेही असले तरी आपण ते आपल्या नावासमोर मोठ्या अभिमानाने लावतो, म्हणून पिढ्यानपिढ्या आडनावाचा वारसा आजही सुरु आहे. मराठी आडनाव हा संपूर्ण भारतात उत्सुकतेचा विषय झालेला आहे.

मनुष्याच्या आडनावाचा उगम  हा बहुतेक करून त्याच्या मूळपुरुषाच्या गावावरून , त्याच्या पारंपारिक व्यवसायावरून, पदव्यांवरून, पशुपक्षी, वृक्ष, वनस्पती, खाद्यपदार्थावरून त्याच्या पूर्वजांना मिळालेल्या पदावरून किंवा अधिकारावरून अशीही आडनावे आहेत. आडनाव प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपल्या नावासमोर मोठ्या अभिमानाने जन्मभर लावीत असतो. आडनावामुळे त्या कुटुंबातील व्यक्तीच्या स्वभाव वैशिष्ठ्यांची आणि गुणांचीही ओळख पटते. स्त्रिया‌ आणि आडनावं यांचा तसा काहीच सबंध पुर्वी नव्हता. लग्नापुर्वीचा काहीकाळ सोडला तर त्यांची खरी ओळख त्यांच्या लग्नानंतरचीच ! मग पतीचं आडनाव हेच त्यांचे आडनाव! परंतु शिक्षण आणि आत्मनिर्भरता यामुळे आलेले भान, यामुळे स्त्रियांना लग्नानंतरही त्यांच्या माहेरचे आडनाव कायम ठेवण्यास प्रेरित केले आहे आणि अनेक महिलांनी यातून सुवर्णमध्य साधून जोड आडनावे लावायला सुरवात केली आणि हा ट्रेंड अद्याप सुरू राहिला आहे.

गाव. शहर यांच्या नावावरून आडनाव आहे तर काही त्यांच्या व्यवसायावर तर काही ग्रामनामावरूनही आडनावं आहेत. आडनावांच्या  बाबतीत  'मराठी पाऊल पडते पुढे'  हे तंतोतंत लागू पडते. त्यातील काही आडनावं...

  • पारंपारिक व्यवसायावरून काही आडनावे माणसांना  शोभूनही  दिसतात उदा. सोनार, कुंभार, आदी.
  • संख्येवरूनही काही आडनावं आहेत. उदा. एकबोटे, बारटक्के आदी
  • खाद्यावरून काही आडनावं उदा. तुपे, हिंगे, वडे, गोळे, वरणे, शिरभाते आदी.
  • गाव-शहरांच्या नावांवरून अनेक आडनावं आहे . उदा. सोलापूरकर, पुणेकर असे कदाचित आणखीन असतील. 
  • फळांच्या नावावरूनही खूप आडनावं आहेत. उदा. बोरे, आंबेकर, केळेकर, बोरकर, जांभळे आदी
  • भाज्यांवरूनही अनेक आडनावं आहेत. उदा. कोथिंबीरे, पडवळ आदी
  • पक्ष्यांवरूनही आडनावं आहेत. उदा. ससाणे, चिमणे, कावळे आदी
  • प्राण्यांवरून आडनावं आहेत उदा. वाघे, वाघमारे कोल्हे, घोडके आदी
  • रंगावरुनही आडनावं आहेत उदा. काळे, पांढरे, तांबडे, दगडे आदी 
  • अन्नधान्यावरुनही आडनावं आहेत उदा. ताकभाते, तुपे, भाजीभाकरे आदी
  • अनेक चित्रपटसृष्टीतील पूर्वीचे काही कलाकार अद्यापही आपल्या नावासमोर आडनाव लावलेले नाहीत. उदा. काजोल, जयाप्रदा, मधुबाला आदी आडनाव न लावता ही काही कलाकार स्टार बनले आहेत. 

मोठी बातमी - ८१ वर्षांचे आजोबा, ७० वर्षांच्या आजी; सायन रुग्णालयात कोरोनावर झाला उपचार आणि...
प्रत्येक आडनावाला इतिहास असतो. काही काही आडनावं त्या व्यक्तींना, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभतही नाहीत. बहुतांश व्यक्तींना तो माहित नसतो. काहींना तो आख्यायिकांच्या स्वरूपात माहित असतो. तर काही व्यक्तींनी तो घडविलेला असतो. एखाद्या कुटुंबातील व्यक्तिला विचारले की तुमचे आडनाव कसे रूढ झाले? किवा केव्हापासून रूढ झाले? तर ते त्याला नक्की सांगता येणार नाही किंवा ती व्यक्ती तिच्या आडनावाबद्दल कांही आख्यायिका सांगेल. ती ऐकून आपल्याला गंमतच वाटेल. इतक्या लहानशा व क्षुल्लक घटनेमुळे, प्रसंगामुळे किंवा बाबीवरून हे आडनाव कसे पडले असेल आणि ते पिढ्यानपिढ्या कसे राहिले असेल? असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात.

तुम्हाला हे सर्व वाचताना असा प्रश्न नक्कीच पडला असेल ना... आडनाव काहीही असो, ते विनोदी असो, विचित्र असो, विसंगत असो वा हास्यास्पद, आपण त्याच्याकडे फारसं गांभीर्याने न पाहता हसून-खेळून पाहिलं पाहिजे. कारण स्वतः ची ओळख निर्माण करण्यासाठी ती व्यक्ती अहोरात्र मेहनत घेत असते. या विषयावर बोलताना प्रा. शंकर बोराडे म्हणतात की, आडनावांना कोणती ना कोणती पार्श्वभूमी असते. कुटुंब नाव  किंवा आडनाव हे कुटुंब, घराणे, अथवा मूळ गांव यांच्यावरुन ठेवले जातात. बहुतांश व्यक्तींना तो माहित नसतो. काहींना तो आख्यायिकांच्या स्वरूपात माहित असतो. तर काही व्यक्तींनी तो घडविलेला असतो.

तसेच यावेळ प्रा. प्रदीप मोहिते म्हणतात की, आडनाव या नावातच आड हा उपसर्ग आहे तेथूनच विनोदाचा भाग सुरू होतो. आपल्या परिवर्तनवादी विचारांचा प्रभाव असलेल्या काळात पितृसत्ताक पद्धतीने समर्थन करणा-या आडनावांच्या विचारांनी माणसांना प्रिय वाटत नाही. पण समाजातील असणाऱ्या आडनावांचा विचार केला तरी काही आडनाव गुणवाचक, प्राणीवाचक, जातीवाचक असतात तर काही आडनाव दरारा निर्माण करणारी असतात. मला असे वाटते की, काळानुसार काही जुन्या आडनावात बदल करण्यात यावेत. आडनावामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी माणसांनी निरोगी आणि निखळ मनाचा माणूस म्हणून समोर यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan : गिरीश महाजन ठरले पुन्हा संकट मोचक; बंडखोरी थोपविण्यात यश

Nashik East Assembly Constituency : बालेकिल्ला शाबूत, ढिकलेच ‘पहिलवान’

SCROLL FOR NEXT