जगभरात कोरोना मोठ्या प्रमाणात फोफालाय. हजार दोन हजार नव्हे तर साधारणतः तीन लाखांच्या आसपास नागरिकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावलेत. याचसोबत साधारणतः ४३ लाखांवर जगभरातील नागरिकांना कोरोनाची लागण झालीये. भारतात देखील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. भारतात कोरोना रुग्णांची आकडेवारी ७८ हजारांवर गेलीये. मात्र जगभराच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची आकडेकरी तुलनेत कमी आहे.
एकीकडे कोरोनामुळे रुग्णांचा आणि त्यामुळे दगावणाऱ्यांची आकडेवारी वाढतेय. अशातही आणखी एका दुसऱ्या आजारामुळे येत्या सहा महिन्यात तब्बल पाच लाख लोकं दगावण्याची शक्यता आहे. स्वतः WHO च्या माध्यमातून समोर येतेय. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) आणि यूएनएड्स (UNAIDS) च्या अंदाजावरून पुढील सहा महिन्यात आफ्रिकेच्या उप-सहारान भागात एड्समुळे 5 लाख लोकांचा मृत्यू होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. दुर्दैवाने असं झाल्यास 2008 मध्ये एड्समुळे मरण पावलेल्यांचा हा विक्रम तुटू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय.
खरंतर 2010 पासून आफ्रिकेत अँटीरेट्रोव्हायरल (ARV) थेरपीमुळे HIV- AIDS संसर्गाचे प्रमाण 43 टक्क्यांनी कमी झाले. मात्र कंडोमची कमतरता आणि एआरव्ही थेरपी, टेस्टिंग किट इत्यादींचीही कमतरता यामुळे 2018 मध्ये 2.5 कोटी लोकांना HIV झाला होता. यातील 64 टक्के अँटीरेट्रोव्हायरस (ARV) थेरपीच्यामी मदतीने बरे देखील झालेत. मात्र सध्या कोरोनाच्या संक्रमणामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या खालावली आहेत. आणि परिणामी HIV क्लिनिकमध्ये अँटीरेट्रोव्हायरस (ARV) थेरपी पुरविल्या जात नाहीत. त्यामुळे येत्या सहा महिन्यात आफ्रिकेत तब्बल पाच लाख लोकांचा एड्समुळे मृत्यू होऊ शकतो.
WHO and UNAIDS says almost five lacs people will lose their life in coming six moth
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.