akash ambani mukesh ambani aston martin esakal
मुंबई

Mukesh Ambani: ॲस्टन मार्टिन नक्की कोणी ठोकली होती? अंबानींच्या मुलावर झाले होते हिट अँड रनचे आरोप

Chinmay Jagtap

8 डिसेंबर २०१३च्या संध्याकाळी, MH 01 BK 99 या क्रमांकाची प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानींच्या मालकीच्या ॲस्टन मार्टिन कारचा अपघात झाला. दक्षिण मुंबई उपनगरातील पेडर रोडवरून जात असताना नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालेला.आज या अपघाताची आठवण येण्याचे कारण म्हणजे, पुण्यात अल्पवयीन मुलाने याने दारु पिऊन चालवलेली कार आणि घेतलेला २ जणांचा बळी. (kalyan nagar pune accident)

त्या वेळी अंबानींच्या कारचा वेग इतका होता की, समोर येणाऱ्या ऑडीला ती कार धडकली आणि दुभाजकावरुन तिने उडी घेत समोरून येणाऱ्या बसला धडक दिली.ऑडी कार मध्ये फोरम रुपारेल नावाची गर्भवती महिला होती, जिला दुखापत झाली होती. याच दरम्यान ॲस्टन मार्टिनने ह्युंडाई एलांट्रा या कारलाही धडक दिली. या कारचे मालक होते विक्रम मिश्रा. (pune accident news)

यावेळी ॲस्टन मार्टिनच्या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.यावेळी लोकांनी त्याला थांबवले मात्र मागून आलेल्या एका कार मधून काही सुरक्षारक्षक उतरले. कार चालकाला आपल्या गाडीत बसवले आणि त्याला घेवून गेले. यावेळी प्रत्यक्षदर्शीनी आरोप केला होता की, ॲस्टन मार्टिनचे चालक मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी होते(akash ambani news)

या नंतर खऱ्या आर्थाने खेळ सुरु झाला. प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी खुप वेळ लावला. पहाटे 5.30 वाजता एफआयआर दाखल करण्यात आला.यावेळी कॅडबरी जंक्शनवरील सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांनी घेतले. यात कोणाचेही चेहेरे दिसत नव्हते. गाडी नक्की कोण चालवत आहे हे त्यात कळू शकत नव्हते. अखेर अंबानींचा चालक ती कार चालवत होता हे समोर आले.(car crash in mumbai )

दुस-या दिवशी रिलायन्सचा चालक बन्सीलाल जोशी ज्याने कंपनीत सुमारे 30 वर्षे काम केले होते तो ही गाडी चालवत होता असे समोर आले. गमदेवी पोलिस ठाण्यात त्याने आपला जबाब नोंदवला. मात्र अनेक गोष्टींमुळे या घटने बाबत संशय व्यक्त केला जात आहे.

पुढील मुद्यांमुळे व्यक्त केला जात आहे संशय

जर ड्रायव्हर कार चालवत होता तर कारच्या पाठोपाठ दोन सुरक्षा रक्षक का होते? कारचा पाठलाग का करत होते?

मागे सुरक्षा रक्षक असतांना कोणताही चालक 4 कोटी रुपयांची ॲस्टन मार्टिन ताशी 100 किमी वेगाने का चालवेल?

अपघात झाल्यावर या ठिकाणी अपघाताची कोणीही नोंद न करता किंवा जबाब नोंदवल्याशिवाय ड्रायव्हरला पळ का काढावा लागला?

ज्या ऑडीला ॲस्टन मार्टिनने धडक दिली त्या ऑडीच्या मालकाच्या मते ॲस्टन मार्टिनचा ड्राइवर तरुण होता.कोणी वयस्कर व्यक्ती नाही. दुसऱ्या दिवशी मात्र दुखापत झालेल्या महिलेने फोरम रुपारेल यांनी बन्सीलाल जोशी हेच कार चालवत होते असा जबाब दिला. शिवाय त्यांनी या केस पुढे चालवणार असल्याचं स्पष्ट देखील केलं. या दोघांनाही नुकसानभरपाई म्हणून नवीन भेट देण्यात आली.

सहाय्यक निरीक्षक पवार यांनी नोंदवलेल्या पहिल्या एफआयआरमधून अंतिम तपशील वगळण्यात आला होता . पोलिसांनी जोशी यांना अटक केली नाही. कारण ते त्याच्या कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची पडताळणी करत होते.(Latest Marathi News)

(सदर माहीती ही India Today च्या एका बातमीतून घेण्यात आली आहे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

Arjun Tendulkar ची भेदक गोलंदाजी; एकाच सामन्यात ९ विकेट्स घेत संघाला डावाने जिंकवलं; पाहा Video

महामंडळाचा प्रसाद फक्त शिंदे गटाला? हेमंत पाटलांसह संजय शिरसाटांवर नवी जबाबदारी; नाराज आमदारांचे राजकीय पुनर्वसन

Kush Maini: धक्कादायक! भारताचा फॉर्म्युला-2 रेसर अपघातादरम्यान थोडक्यात बचावला, दुर्घटनेदरम्यानचा Video आला समोर

SCROLL FOR NEXT