INDIA Alliance Meeting Mumbai Esakal
मुंबई

INDIA Alliance Meeting Mumbai: लोगोचे अनावरण दिल्लीत? संयोजकपदाचा सुद्धा निर्णय टांगणीवर

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक पार पडत आहे. या बैठकासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, लालू प्रसाद यादव यांच्यासह देशभरातील मोदी सरकार विरोधी महत्वाचे नेते मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान संयोजक पदाबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत मतमतांतरे असल्याच्या चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत.

इंडिया आघाडीचं संयोजक पद नेमकं कोणाकडे जाणार? संयोजक पदाचे नाव या बैठकीत जाहीर करणे अडचणीचं ठरणार असल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी नेत्यांनी इंडिया आघाडीचं संयोजक पद नेमकं कोणाकडे जाणार यावरून विरोधकांवर टीका केली आहे.

तर इंडिया आघाडीचे संयोजक पद हे मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे द्यावं यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही असल्याचं दिसून येत आहे. संयोजक पदाबद्दल इतर नेत्यांच्या आणि पक्षांची नेमकी काय भूमिका असणार? याबाबत आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर इंडिया बैठकीतील नेत्यांनी चर्चा करून संयोजक पद कोणाकडे असेल हे ठरवले जाईल असंही सांगण्यात आलं आहे.

दरम्यान मलिकार्जुन खर्गे काँग्रेसचे वरिष्ठ नेता असून ते एक मोठा दलित चेहरा म्हणून समोर आले आहेत. त्यामुळे देशभरातील दलित मत आपल्या बाजूने वळवण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांना संयोजक करावे त्यांचा राजकीय अनुभव इंडिया आघाडीसाठी महत्त्वाचा ठरेल असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. तर काँग्रेसने संयोजक पद न घेता मोठं मन दाखवावं, असं कम्युनिस्ट पक्ष व इतर काही आघाडीतील पक्षांचं मत आहे.

संयोजक म्हणून नियुक्ती करताना भाजप टार्गेट करू शकणार नाही अशा नेत्याला हे पद द्यावं. ज्याची स्वच्छ राजकीय प्रतिमा आहे आणि जेणेकरून अशा नेत्याला भाजप सहजरीत्या टार्गेट करू शकणार नाही, असं मत काही नेत्यांचं आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.

संयोजक पदाच्या स्पर्धेत ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांचे सुद्धा नाव आहे. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव या स्पर्धेत असताना आणि काँग्रेसकडून आग्रह केला जात असताना या नेत्यांचा नेमकं काय म्हणणं आहे? हे सुद्धा ऐकून घ्यावं लागणार आहे. त्याचबरोबर नितीश कुमार यांनीच सर्व विरोधी पक्षांची एक मूठ करण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. असं कोड समोर असताना मुंबईतील इंडिया बैठकीमध्ये संयोजक पदाचे नाव जाहीर केले जाणार की आणखी वेळ घेतला जाणार? हे पाहाणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण ढकललं पुढे

इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण आज करण्यात येणार होते. मात्र हा लोगो अनावरणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरन दिल्लीत करण्याच्या सूचना काही नेत्यांनी दिल्या आहेत. यामुळे दोन ते तीन दिवसानंतर लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत लोगोचं अनावरण झाल्यास देशात चांगला मेसेज इंडियाचा जाईल ही त्यामागची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

J&K Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये खोल दरीत बस कोसळली; 4 जवान ठार, ३१ जखमी

Mukesh Ambani यांनी खरेदी केलं १००० हून अधिक कोटीचं विमान; देशात असं Jet कोणाकडेच नाही; काय आहे खास?

Mumbai News: भर रस्त्यात महिलेला प्रसूतीकळा; ताडपत्री अन् बॅनरच्या मदतीने पोलिसांनी साधलं प्रसंगावधान

Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT