Akshay Shinde Encounter officer  esakal
मुंबई

Akshay Shinde Encounter: कोण आहे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारा ऑफिसर... प्रदीप शर्मांसोबत केलं आहे काम

Who is the officer behind Akshay Shinde's encounter: या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं की पोलिसांनी आत्मरक्षेसाठी ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं.

Sandip Kapde

बदलापूर येथे झालेल्या दुष्कर्माच्या आरोपाखाली असलेल्या अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी अक्षय शिंदेने पोलिसाच्या रिवॉल्व्हरचा वापर करून गोळीबार केल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर प्रत्युत्तर फायरिंग करत त्याला ठार केले. या घटनेने अनेक प्रश्‍न उभे केले आहेत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणारा ऑफिसर कोण आहे?

कोण आहेत संजय शिंदे?

संजय शिंदे हे बदलापुर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी गठीत केलेल्या विशेष तपास पथकाचे (SIT) अधिकारी आहेत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये प्रदीप शर्मा यांच्या सोबत काम केले आहे, ज्यांचं नाव देशातील प्रसिद्ध एन्काऊंटर स्पेशलिस्टमध्ये घेतलं जातं. संजय शिंदे यांचा अनुभव आणि कार्यक्षमता यामुळे या प्रकरणात त्यांचे महत्त्व वाढलं आहे.

वर्ष २०१४ मध्ये खूनाच्या आरोपी विजय पालांडेच्या फरार होण्याच्या घटनेनंतर संजय शिंदे यांना निलंबनाचा सामना करावा लागला होता, परंतु ते पुन्हा सेवेत रुजू झाले. याशिवाय, त्यांनी इक्बाल कासकरला अटक करण्याचं महत्त्वपूर्ण कामही केलं होतं.

इक्बाल कासकरला अटक करण्याचं महत्त्वपूर्ण काम

प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसांमध्ये एन्काऊंटर स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक गुन्हेगारांचा एन्काउंटर केल्याचे मानले जाते. १९९०च्या दशकात त्यांनी विशेषतः दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या टोळ्यांशी संबंधित गुन्हेगारांना लक्ष्य केले होते. संजय शिंदे यांनी देखील दाऊद इब्राहिमच्या भावाला, इक्बाल कासगरला अटक करणाऱ्या टीममध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. सध्या संजय शिंदे बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा (SIT) भाग आहेत.

नेमकं काय घडलं?

अक्षय शिंदेला बदलापुर येथे यौन शोषणाच्या प्रकरणात तपासासाठी नेलं जात असताना, त्याने पोलिस अधिकाऱ्याची रिवॉल्व्हर हिसकावून दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यात एक अधिकारी जखमी झाला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला, ज्यात अक्षय शिंदे जखमी झाला आणि त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं की पोलिसांनी आत्मरक्षेसाठी ही कारवाई केल्याचं त्यांनी सांगितलं.

राजकीय प्रतिक्रिया आणि चौकशीची मागणी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेवर भाष्य करत म्हटलं की पोलिसांनी आत्मरक्षेसाठीच गोळीबार केला होता. त्यांनी या घटनेचं राजकारण करणं टाळावं, असा इशारा विरोधकांना दिला.

दुसरीकडे, विरोधी पक्षांनी या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हा एन्काऊंटर काही लोकांना वाचवण्यासाठी केल्याचा आरोप केला आहे.

सरकारकडून या घटनेवर स्पष्टीकरण मिळालं असलं, तरी अद्यापही अनेकांमध्ये या प्रकरणाबाबत शंका आहे. राज्यातील जनतेला सत्य काय आहे, हे कळवणं आवश्यक असल्याचं मत विरोधक व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT