NCP Leader Baba Siddique Shot Dead 
मुंबई

Who Is Baba Siddique : राष्ट्रवादीचे बाबा सिद्दीकी कोण होते? मुंबईत त्यांची गोळ्या घालून झाली हत्या

NCP Leader Baba Siddique Shot Dead : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.

रोहित कणसे

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्या छातीला गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांचे बॉलिवुडशी अत्यंत जवळचे संबंध सर्वांना परिचीत आहेत. बॉलिवुड अभिनेता सलमान खान, शाहरुख खान यांच्यासह अनेक कलाकार बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावत.

पण हे बाबा सिद्दीकी नेमके कोण?

बाबा सिद्दीकी यांचे पूर्ण नाव जियाउद्दीन सिद्दीकी असे होते. विद्यार्थी जीवनातच त्यांनी काँग्रेस पक्षात काम करण्यास सुरूवात केली होती. वेगवेगळ्या आंदोलनात त्यांचा सहभाग होता. बाबा सिद्दीकी यांचे शिक्षण मुंबईच्या एमएमके कॉलेजमध्ये झाले. काँग्रेस पक्षात सहभागी झाल्यानंतर बाबा सिद्दीकी दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडणून आले.

बाबा सिद्दीकी यांचे वडील वांद्रे येथे घड्याळ दुरुस्तीचे काम करायचे. सिद्दीकीही त्यांना कामात मदत करत असत. पण पुढे शालेय जीवनात त्यांना राजकारणात रस निर्माण झाला. सिद्दीकी १९७७ मध्ये एनएसयूआय मुंबईचे सदस्य झाले. १९८० मध्ये त्यांना वांद्रे युवक काँग्रेसचे सरचिटणीस आणि ८२ मध्ये अध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत जिंकून ते नगरसेवक बनले, त्यांनी तिथे स्वत:ला प्रस्थापित केले, पुढे निवडणूक लढवली आणि वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा विधानसभेत पोहोचले. ते तीन वेळा १९९९, २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडणून आले होते. या काळात त्यांना राज्यमंत्री देखील करण्यात आले होते.

लोकांमध्ये बाबा सिद्दीकी चांगलेच प्रसिद्ध होते. आपल्या मतदारसंघातील लोकांच्या मदतीसाठी कायम उपलब्ध राहणे तसेच आपल्या आमदार निधीमधून मतदारसंघात विवीध विकासकामे करण्यासाठी ते विशेषतः ओळखले जायचे.

इफ्तार पार्टी होतं मोठं आकर्षण

बाबा सिद्दीकी यांची नॅशनल मीडियामध्ये जोरदार चर्चा झाली जेव्हा त्यांनी रमजान महिन्यात इफ्तार पार्टी देण्यास सुरूवात केली. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत फक्त राजकीय नेतेच नाही तर चित्रपट जगतातील अनेक दिग्गज देखील हजेरी लावत. अभिनेता सलमान खान, शाहरुख खान असे बडे कलाकार बाबा सीद्दीकी यांच्या पार्टीमध्ये सहभागी होत. बॉलिवुड स्टार सलमान खान आणि शाहरूख खान यांच्यात झालेल्या वादानंतर दोघे अनेक वर्ष एकमेकांशी बोलत नव्हते. यानंतर दोगांना बाबा सिद्दीकी यांनी या दोघात मध्यस्थी करत हा वाद सोडवल्याचे सांगितले जाते.

नेमकं काय झालं?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर अज्ञात तरुणांनी गोळीबार केला. यात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला आहे. वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर परिसरात ही घटना घडली. तीन ते चार तरुणांकडून गोळीबार केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं साम टीव्हीच्या सुत्रांनी सांगितलं आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वीच त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एसआरए प्रकल्पातील वादातून ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

बाबा सिद्दीकी हे मुंबईतील निर्मल नगर इथं एका जाहीर कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी सिद्दीकी यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी झाली, त्याआडून त्यांच्यावर गोळीबार झाला . त्यांना तीन गेळ्या लागल्याची माहिती साम टीव्हीच्या सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT