Pandhari Sheth Phadke Passed Away Esakal
मुंबई

Pandhari Sheth Phadke : कोण होते पंढरीशेठ फडके? प्रत्येक शर्यतीत बैलगाडा नंबर 1 येण्याचं सिक्रेट काय होतं

अक्षता पांढरे

Pandhari Sheth Phadke Passed Away: महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध नाव म्हणजे पंढरी शेठ फडके यांच हृदयविकाराचा झटक्यानं निधन झालं. दुपारी ऑफिस वरून घरी जाताना एक दीडच्या सुमारास कारमध्ये जाताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

मराष्ट्रातील प्रसिद्ध गाडामालक अशी पंढरी शेठ फडके यांची ओळख होती. पनवेलच्या विहिघरचे पंढरी शेठ फडके यांच्या वडिलांच्या काळापासून म्हणजे 1986 सालापासून बैलगाडा शर्यतीत आवड त्यांना होती. बादल हा त्यांचा बैलही महाराष्ट्राचत तितकाच फेमस.

त्यांच्या दावणीत ४० -५० शर्यतीचे बैल असल्याचं बोललं जातं आणि या बैलांना महिन्याला लाखभर रुपयांची खाद लागते असं म्हणतात. बैलगाडा प्रेमी असण्यासोबत गोल्डमॅन म्हणूनही ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. गळाभर सोनं घालून गाडीच्या टपावर त्यांचा डान्स चांगलाच चर्चेत असायचा.

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. जिथे जिथे बैलगाडा शर्यत व्हायची तिथे पंढरी शेठ फडके यांचा गाडा धावणार नाही असं फार क्वचित व्हायचं. कुठल्याही शर्यतीत एक नंबर येणारा बैल हा पंढरी शेठ फडकेंना आपल्या दावणीत पाहिजे असायचा मग त्याची किंमत कितीही असली तरीही. बैलांना खादीमध्ये शेंगदाणे, काजू, बदाम, डाळ, पिस्ता, खोबरं, अशा सगळ्यांचा वापर करून बैलांना अंगाने तंदुरुस्त बनवण्यामध्ये पंढरीनाथ फडके नंबर वनला असत.

पंढरीशेठ फडके हे शेतकरी कामगार पक्षाचे नेतेही राहिलेत. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, २०२२ मध्ये कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणी पंढरीनाथ फडके यांना अटक झाली होती या प्रकरणात त्यांना काही महिन्यांपुर्वी जामिनही मिळाला होता.

पंढरीनाथ फडके यांना कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणात अटक झाली होती आणि ते जामिनावर बाहेर होते. २०२० मध्येही पनवेलमध्ये एका क्रिकेट मॅच दरम्यानही मैदानात एन्ट्री करताना त्यांनी हवेत गोळीबार केला होता.एकूण 4 राऊंड त्यांनी हवेत फायर केले त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकाने त्यांच्यावर नोटाही उधळल्या होत्या. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता.

बैलगाडा शर्यतयीवर बंदी आल्यानंतर ही शर्यत पुन्हा व्हावी यासाठी प्रयत्न करण्यापैकी एक पंढरी शेठ फडकेंच नावं घेतलं जातं. पंढरीनाथ फडके महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसीएशनचे अध्यक्ष होते. बैलगाडा शर्यतीसाठी कोर्ट आणि इतर शासकीय दरबारी फडके यांनी पुढाकार घेतला होता. जवळपास 40-50 शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत.

बैलगाडा प्रत्येक शर्यतीत नंबर 1 येण्याचं सिक्रेट काय होतं?

पंढरीनाथांकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल नावाचा बैल होता. याच बादलने तब्बल 11 लाख रुपये बक्षीस असलेली शर्यत जिंकली, बादलचा मोठा चाहता वर्ग आहे. शर्यतीत पहिला नंबर येण्याचं सिक्रेट म्हणजे व्यायाम, वेळच्या वेळी खाद आणि निगा राखणं. बैलांना खादीमध्ये शेंगदाणे, काजू, बदाम, डाळ, पिस्ता, खोबरं, अशा सगळ्यांचा वापर करून बैलांना अंगाने तंदुरुस्त बनवण्यामध्ये पंढरीनाथ फडके नंबर वनला असत. (What was the secret of bullock cart being number 1 in every race?)

बादल हा, माणसांमध्ये मिसळणारा. व्यायाम, वेळच्या वेळी खाद आणि निगा राखल्यानं बादलनेही पंढरीनाथांना मोठी कमाई करूण दिली, असं म्हणतात. मोठ्या बक्षिसांच्या शर्यतीला बादल जाणार म्हणजे जाणार हे ठरलेलं असायचं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गाडी मुंब्रा बायपासवर आली, तेव्हाच अक्षयने बंदूक खेचली अन्... अखेर पोलिसांनी घटनाक्रम सांगितला!

अक्षयला कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी व्हायला हवी होती; गृह विभागाचा हलगर्जीपणा संशयास्पद, शरद पवारांची प्रतिक्रिया

आरोपी Akshay Shinde याच्या मृत्यूमागे रश्मी शुल्कांचा हात, नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप

Akshay Shinde Encounter: ''स्वसंरक्षण की हत्या?'' अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उपस्थित होताएत 'हे' प्रश्न; न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर वेळी नक्की काय घडलं? पोलिसांवर का व्यक्त केला जातोय संशय? वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT